स्व. श्रीधररावजी देशमुख जयंती २३ फेब्रुवारीला व श्रीधर पर्वात जन्मशताब्दी महोत्सव!


 संजय देशमुख  21 Feb 2022, 8:16 PM
   

अकोला : अकोला जिल्ह्यात निंबा (बाळापूर) परिसरातील थोर कर्तृत्ववादी आणि सामाजिक सेवेतील एक कृतार्थ व्यक्तीमत्व, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत निःस्वार्थ सेवक स्व. श्रीधररावजी देशमुख उपाख्य “मालक” यांची ९९वी जयंती आणि आगामी २०२३ पर्यंत जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दि. २३ फेब्रुवारी २०२२ ते २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमांच्या आयोजनांचे खास श्रीधर पर्व साजरे केले जाणार आहे. यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य श्री हेमंत काळमेघ यांचे मार्गदर्शनाखाली जन्मशताब्दी महोत्सव समिती तयार करण्यात आली असून यामध्ये नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.
श्रीधर पर्वच्या पत्रकार परिषदेला कॉँग्रेससचे ज्येष्ठ नेते अजहरजी हुसेन, महेशजी गणगणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री उमेशजी जाधव, मानव ट्रस्टचे श्री मनोज महाजन, भा . ज. पा . प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, शिवाजी संस्थेचे आजीव सभासद रामेश्वरराव वाकळे, हॉटेल सेंट्रल प्लाझाचे संचालक श्री प्रशांत देशमुख, विश्वप्रभातचे संपादक संजय एम. देशमुख, गाडगेबाबा मंडळाचे प्रा. गजानन भारसाकळे, निंबा गावचे पोलिस पाटील श्री प्रमोद देशमुख, सरपंच श्री. पुरुषोत्तम सोनवणे व मालकांचे कनिष्ठ चिरंजीव श्री. कृष्णराव देशमुख उपस्थित होते. 
23 फेब्रुवारी 1923 ला स्वातंत्र्यपूर्ण काळात त्यांचा जन्म झाला. एक निर्व्यसनी सदाचारी व अध्यात्मवादी सत्संगी  व स्वातंत्र्य चळवळीतील हे व्यक्तीमत्व होते. आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेच्या ध्येयसंकल्पात घालवून संपूर्ण निंबा परिसराचा कायापालट घडवून आणणार्‍या श्रीधरराव देशमुखांच्या झंझावती कार्य आणि काँग्रेस पक्षनिष्ठेची दखल अनेक मुख्यमंत्री आणि मुंबई दिल्लीपर्यंत कायम होती. त्यामुळे त्या काळात आमदार, खासदारकीच्या सुवर्ण संधी चालून आल्यावरही तिकीटे नाकारून फक्त निःस्वार्थ जनतेसेवेला प्राधान्य देणारे संवेदनशील सेवाव्रती होते. ४०० एकर शेतीमधून समाजसेवेत शेवटी १०० एकर शेती त्यांच्याकडे शिल्लक होती. त्यामुळे विकासाच्या प्रकाशात जनजीवनाला उजळवून अस्तास गेलेला प्रकाशरुपी तारा म्हणून त्यांच्या स्मृती जनहृदयात आजही कायम आहेत.  जनसेवेत जनतेने दिलेल्या प्रेमाची पावती म्हणजे त्यांना प्राप्त झालेले मालक हे संबोधन होते. म्हणून त्यांच्या स्मृतीला अभिवादन आणि त्यांच्या आदर्शांच्या प्रेरणा अमर रहाव्यात यासाठी निंबा परिसर व ठिकठिकाणच्या चाहत्यांनी श्रीधर पर्वात त्यांचा जन्म शताब्दी महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.  
येत्या २३ फेब्रुवारीच्या जयंत उत्सवदिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या येत्या १०० व्या जयंतीपर्यंत एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्षभरात विविध स्पर्धा, कृषी मेळावा, मोफत मोतीबिंदु तपासणी, शस्त्रक्रिया व रोगनिदान शिबिरे, वृक्षारोपण व रेशनकार्ड शिबीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व आर्थिक दुर्बल घटक, वंचित निराधारांना विविध सहाय्य अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ फेब्रुवारीचा जयंती उत्सव शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार श्री नरेशचंद्र ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत असून शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष श्री रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगोले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश पाहरे यांचेसह समिती सचिव श्री हेमंत काळमेघ (सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) माजी मंत्री अजहर हुसेन, सुधाकरराव गणगणे, डॉ. संतोषकुमार कोरपे, अ‍ॅड. गजाननराव पुंडकर, केशवराव मेतकर, केशवराव गावंडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, माजी आमदार संजय गावंडे, वर्‍हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ, शिरीष धोत्रे, डॉ. सुभाष कोरपे, मनोज महाजन, प्रशांत देशमुख, विश्वप्रभातचे संपादक संजय एम. देशमुख, गिरीश जोशी, संदिप पुंडकर, उमेश जाधव, रामेश्वरराव वाकळे, बाळगंगाधर वैराळे, रमेशराव सातारकर, सुरेश आढे, भास्करराव पाटील, पुरूषोत्तम दहे, भानुदास उंबरकर, विनायकराव लांडे, निंबा पोलिस पाटील प्रमोद देशमुख, सरपंचा सौ. ज्योती सोनोने, सौ. अंजली तायडे, गणेश देशमुख, धम्मपाल तायडे, प्रा. गजानन भारसाकळे, कृष्णराव श्रीधरराव देशमुख, व विजय ठोकळ यांचा समावेश आहे. हा जन्म शताब्दी महोत्सव नियोजनबद्ध रितीने साजरा होण्याकरीता आयोजन समितीसोबत निंबा व पंचक्रोशीतल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सक्रिय आहेत.

    Post Views:  539


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व