कान्हेरी सरप येथे वृक्षारोपण, कुषी अधिक्षक कार्यालयाची जिल्हा मासीकसभा, चर्चासंत्र, प्रक्षेत्र भेट संपन्न


 विश्वप्रभात  30 Jul 2024, 8:01 PM
   

अकोला - कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केले वृक्षारोपण कान्हेरी सरप येथील मधुरत्न जैविक कुषी फार्म येथे 
कृषी भूषण श्री.मधुकरराव सरप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.प्रकाश घाटोळ सर,व डॉ.पी.के राठोडसर  यांच्या शुभहस्ते व मान्यवरांचा उपस्थिती मध्ये  जिल्हा उपसंचालक व तंत्र अधिकारी मा.श्री विलास वाशीमकर सर, तसेच अकोला तालुका कृषी अधिकारी श्री.शंशीकिरण जांभरुणकर  सर, बार्शीटाकळी तालुका कुषी, अधिकारी‌ सौ‌. संध्या करवा मॅडम,श्री‌.दत्तात्रय काळे, श्री.माधवराव  राऊत, श्री.संजय अटक,शिवाजी जाधव,युवराज अंभोरे के के जाधव, सुरेंद्र अंभोरेसर, कैलास राठोड,अजय चव्हाण ,अविनाश मेश्राम, प्रकाश मनोहर,श्री आंधळे  सर, सौ. तृप्ती वावकार  मॅडम यांनी सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली तसेच  उपस्थित सर्व मान्यवर मंडळीचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले स्वागतामध्ये श्री. दीपक मधुकरराव सरप  सौ.ज्योती दीपक सरप  सौ. छाया योगेश सरप , प्रा.डॉ योगेश सरप यांनी सर्वांचे वृक्ष देऊन स्वागत केले अकोट तालुका कृषी अधिकारी, बाळापूर ता. कुषी अधिकारी, मुर्तीजापुर ता.कृषी अधिकारी,पातुर ता. कृषी अधिकारी, तेल्हारा तालुका कृषी अधिकारी तसेच अकोला जिल्ह्यातील  सर्व कुषी अधिकारी सर्व मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक या सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  व वृक्षारोपण,चर्चासत्र , प्रक्षेत्र भेट देऊन मधुरत्न जैविक कृषी फार्म मध्ये संपूर्ण उद्योगाची माहिती जाणून घेतली व विहित अन्नप्रक्रिया युनिटची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेतली तरी नवतरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून व्यवसायात, उद्योगात भरारी घ्यावी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा मधुरत्न जैविक फार्म चे अनुकरण करावे अशी शास्त्रज्ञ डॉ.प्रकाश घाटोळसर, डॉ. राठोड सर व  सर्व कृषी अधिकारी यांनी मनोदय  व्यक्त केला व मधुरत्न जैविक कृषी फार्मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कृषी भूषण श्री मधुकरराव सरप यांनी सर्व मान्यवरांनी  वृक्षारोपण केल्याबद्दल आभार  मानले*.

    Post Views:  20


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व