दुचाकीच्या अपघातातील गंभीर जखमीच्या मदतीसाठी दहा मिनटात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन घटनास्थळावर दाखल
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Feb 2025, 9:36 AM
कुठला प्रकारचा वेळ डीले न होऊ देत घटनास्थळी दहा मिनटात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची रुग्णवाहिका व सेवक दाखल होऊन तात्काळ पिंजर येथील प्रा.आ.केंद्रात दाखल केले
मुर्तीजापुर ते पिंजर रोडवरील पिंजर ते मोझरी खु.फाट्यावर अजाबराव नामदेव राठोड वय अं.35 वर्ष रा.मोझरी ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला हे पडुन अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहीती मोझरीचे सरपंच संकेत राठोड आणी मोझरी येथील पुणे पोलीस रतन राठोड साहेब यांनी पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती दिली आणी लगेच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार,महेश वानखडे यांना पथकाच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी रवाना केले तो पर्यंत जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अ.डाॅ.काजल काळे मॅडम यांना माहीती देऊन सज्ज ठेवले लगेच जखमीला येथे आणले असता वैद्यकीय अ.डाॅ.काजल काळे यांनी उपचार करुन पुढील उपचारासाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.
Post Views: 96