माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची मुलाखत
मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि. २ डिसेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत. या दोन्ही संस्थांचा मतदार नोंदणी संदर्भात एकमेकांशी साधण्यात येणारा समन्वय, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०, मतदानाच्या वेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी मतदारांनी घ्यावयाची खबरदारी, मतदारांना केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. कुरुंदकर यांनी ‘जय महाराष्ट्र ‘ या कार्यक्रमातून दिली आहे.
Post Views: 258