मध्यवर्ती कारागृहामध्ये कुष्ठरोग जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-04-13
   

अकोला ः राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कारागृहातील बंदीची कुष्ठरोग तपासणी करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी कारागृह उपअधिक्षक राजेंद्र पाटील तसेच डॉ. रविंद्र आर्य वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
बंदी बांधवांच्या आरोग्य तपासणी करण्याकरीता सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग, अकोला या कार्यालयातील कर्मचारी/अधिकारी एन.आर.पाटील पर्यवेक्षक, दिनेश उबरहंडे, डि.के.गुल्हाने, जे.डी.पीटर आणि जी.व्ही.बोडखे यांची टिम उपस्थित होती. सर्वप्रथम डॉ. रविंद्र आर्य यांनी प्रासंगीकपर सर्व उपस्थित मार्गदर्शन केले. दिनेश उंबरहंडे यांनी उपस्थित कुष्ठरोग विषयी शास्त्रोक्त माहिती दिली. जसे कुष्ठरोग अनुवंशिक नाही कुष्ठरोग जीवाणुमूळे होणारा आजार आहे. कुष्ठरोगामुळे लवकर निदान व नियमित उपचार न घेतल्यास व्यंग/विकृती होऊ शकते. तसेच कुष्ठरोगामुळे हातापायावर /शरीरावर लालसर फिक्कट चट्टे येतात. तसेच हातापायाला मुंग्या येऊन बधिरता येऊ शकते. तसेच सर्वांनी शरीरावर कोणताही चट्टा असल्यास तपासणी करून आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बंदी बांधवांची शारीरिक तपासणी केली. त्यामधून संशयीत रुग्ण आढळले. त्यापैकी 2 रुग्णांचे निदान झाले. त्यांना बहुविध उपचार देण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रशासनाचे सहकार्य लाभले. 

    Post Views:  330


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व