मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयाने केला शिक्षक दिनी आदर्श शिक्षकांचा सन्मान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Sep 2025, 11:05 AM
अकोला : खडकी विभागातील न्यु महसुल कॉलनी येथील मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयाचे वतीने ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता शिक्षक दिनी परिसरातील आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय बजरंग विद्यालयाचे आदर्श शिक्षक बबलू तायडे सर होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गौतम पडघामोल सर, शिक्षण विभागातील बरेचसे पुरस्कार प्राप्त असलेले, व प्राजक्ता विद्यालयाची मुलींची कबड्डीची टीम राज्यस्तरावर नेणारे आदर्श शिक्षक ओरा चक्रे सर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर्नालिझम कॉलेजचे प्रा. योगेश काटोके सर आदी शिक्षकांचा सत्कार मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव वर, कोषाध्यक्षा सुनंदाताई पंजाबराव वर, जिल्हाधिकारी कार्यालयातील से.नि. कर्मचारी रत्नाकर भुजाडे साहेब, पोलीस विभागातील से.नि. टेकाम साहेब, एस. टी. विभागातील से.नि. सन्माननीय वानखडे साहेब, युवा कार्यकर्ता मंगेश झिने, दिनेश सोनोने, मनिषा भुजाडे, मिनाक्षी शेगोकार, विद्या अंभोरे, सुरेखा सोनेने, मनुताई बदरखे, अजिंक्य, समृद्धी, ईश्वरी, मनस्वी, अनूजा, मंजिरी, देवांशी, वेदांशी आदींची उपस्थिती होती.
Post Views: 134