शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गटामध्ये हाणामारी; दादरमध्ये तणाव, गोळीबार केल्याचा दावा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  11 Sep 2022, 12:10 PM
   

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे गटात सुरु असलेल्या तणावाचं रुपांतर मारामारीत झाल्याचं दादरमध्ये पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गटाचे सरवणकर समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने वेळीच संघर्ष टळला. मात्र या वादाचे पडसाद पुन्हा उमटले आहेत. 

शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण झाल्याचं समोर आले. त्यानंतर दादरमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेत पोलिसांनी ५ शिवसैनिकांना अटक केली असून २०-२५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. प्रभादेवीत झालेल्या घटनेबाबत संतोष तेलवणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्यावरून हाणामारीचा प्रकार घडला आहे. याबाबत संतोष तेलवणे म्हणाले की, मी इमारतीखाली उभे असताना ५० जण माझ्यासमोर आले आणि माझ्याशी वाद घातला. मी एकटा त्यांना पुरेसा होता. हात लावायचं तर ठार मारा, जिवंत ठेवला तर तुम्हाला एकेएकेला घरातून उचलून मारेन. आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पूर्वीची शिवसेना राहिला नाही. आधी १-२ जण मारायला जायचे आता एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जात आहोत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गोळीबार वाघांवर केला जातो, शेळ्यांवर नाही. प्रकरण वाढवण्यासाठी निमित्ताने गोळीबाराचा आरोप करण्यात येत आहे. झटापटीत माझी चैन गेली. मारायला आलेल्यांपैकी अनेकांच्या आईवडिलांचे फोन आले. शिवसेनेत असल्यापासून ते आमच्याविरोधात होते. सामना कार्यालयावर जेव्हा हल्ले झाले तेव्हा सदा सरवणकर, समाधान सरवणकर छातीठोक उभे राहिले. आमचं वैर शिवसैनिकांशी नाही. जे आमचे विरोधक होते. ते केवळ आम्हाला विरोध करण्यासाठी पक्षात पुढे पुढे करतायेत असा आरोप संतोष तेलवणेंनी केला. 

आमदारांनी गोळीबार करुन धमकावलं
आमच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी ज्या कोळी समाजाच्या आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोलले गेले. आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलाचा गैरवापर करून धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला असता. सत्तेचा माज किती झालाय हे या घटनांवरून दिसून येतेय असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी केला. 

    Post Views:  311


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व