जि. प. प्राथमिक शाळा नकाशी येथे ७ जानेवारीला पालक सभेचे आयोजन


 संजय देशमुख  13 Jan 2022, 4:36 PM
   

नकाशी : जि. प. प्राथमिक शाळा नकाशी येथे शाळा व्यवस्थापन समितीची  तथा प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेची नवीन व्यवस्थापन समिती  गठित  करण्यासाठी दि.०७ जानेवारीला पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेमधून सर्व सदस्यांची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून श्री श्रीकांत भगवान सरदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून प्रशांत धर्माजी घाटोळ यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे यांनी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभासदांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री शीतल तायडे यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. सभेचे कामकाज शाळेच्या मुख्याध्यापिका सौ डोंगरे यांनी पूर्ण करून उपस्थित पालकांचे व पालक वर्गाचे आभार व्यक्त केले. तसेच शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री श्रीकांत सरदार यांचा सत्कार करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विमल डोंगरे. 

    Post Views:  175


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व