जिव्हाळा संस्था व भरारी महिला बचत गटाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी.
अकोला- स्थानिक डाबकी रोड वानखडे नगर मधील सार्वजनिक सभागृहामध्ये जिव्हाळा संस्था व भरारी महिला बचत गटाच्या वतीने आज राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली तर
त्या वेळी श्रीमती विनाताई देशमुख जेष्ठ महिला अध्यक्ष स्थानी उपस्थित होत्या कार्यक्रम मध्ये जिव्हाळा संस्थेच्या अध्यक्षा सौ अलका देशमुख यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मुळे शिवाजी महाराज घडले व आपण आज स्वतंत्रपणे जगत आहोत प्रत्येक घरात आज जिजाऊसारखे विचार आपल्या मुलांना देण्याची गरज आहे. असे विचार त्यांनी मांडले कार्यक्रमाला सौ सविता देशमुख व सौ प्राजक्ता सौ. ज्योत्स्ना सौ.हेमलता व सौ अंजली इंगळे सौ. निता सौ छायाताई व सौ रेणुका सौ.सारीका सौ.अनुजा सौ. शुभांगी सौ. माधुरी व सौ निता सौ.अश्विनी सौ. सोनाली सौ. कविताताई सौ.गौरी सौ.शिल्पा उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ . ज्योत्स्ना देशमुख यांनी केले तर आभार सौ माधुरी यांनी मानले
Post Views: 225