मॉ. गायत्री ज्येष्ठ नागरिक संघाला आ. मिटकरी यांनी दिला 5 लाखाचा निधी
अकोला-मॉ. गायत्री ज्येष्ठ नागरिक संघाला आमदार अमोल मिटकरी यांनी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गायत्री नगर परिसरात असलेल्या जेष्ठ नागरिक संघातील वयोवृद्ध नागरिकांना दैनंदिन उपयोगाकरिता सुसज्ज अशा टिन शेड ची गरज होती. नागरिकांनी आपली ही मागणी आ. अमोल मिटकरी यांचे समोर मांडतात त्यांनी त्वरित हा 5 लाख रुपयांचा निधी सदर कामाकरिता मंजूर केला.
मॉ. गायत्री संघाची आज एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख अतिथी म्हणून आ. मिटकरी उपस्थित होते. या संघात वारकरी संप्रदायातील अनेक वयोवृद्ध नागरिक सभासद आहेत. संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या करिता एक विरंगुळा केंद्र तयार करण्यात आलेले आहे. या केंद्रात एका अद्यावत अशा टिन शेडची अतिशय गरज होती. आ. मिटकरी यांनी दिलेल्या निधीमुळे ही गरज आता पूर्ण होणार आहे. याप्रसंगी संघातर्फे आ. मिटकरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष प्रभु नारायण बिसेन, सचिव अशोक मांगुळकर, राम दयाल इंगळे, जाधव, कडू, ठाकरे व इतरही सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते
Post Views: 54