शिवराजे जामोदे यांनी जिंकले नाशिक


मा छगनजी भुजबळ यांच्या समवेत शिवराजे जामोदे (ग्रंथदिंडी )
 संजय देशमुख  07 Dec 2021, 11:37 AM
   

तेल्हारा : महाराष्ट्र प्रसिद्ध निसर्गकवी शिवराजे जामोदे यांची नाशिकच्या अखिल  भारतीय मराठी साहित्य संमेलनामधील भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या या कार्याची दखल धिविध वृत्तवाहिन्यांनी व वृत्तपत्रांनी घेतली. 
           शिवराजे जामोदे हे नाशिक येथिल ग्रंथदिंडी मध्ये पोशाखावर कविता लिहून, डोक्यावर फेटा बांधून सहभागी झाले होते. 
             कुसुमाग्रज हे 
             साहित्याचे रवी 
             कविंचेहो कवी 
             एकमेव. .
त्यांच्या या काव्यपंक्ती आणि संपुर्ण रचना हजारो रसिकांच्या पसंतीस उतरली. आगळा वेगळा पोशाख, मराठी भाषेवरील प्रेम, गंथ्रदिंडीतील पावली  नृत्य  आकर्षण ठरले. जागोजागी त्यांच्या सोबत रसिक फोटो घेत होते, त्यांचे अभिनंदन करित होते .
           अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा छगनजी भुजबळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. शिवराजे जामोदे कविराज हे तेल्हारा तालुक्यातील आडसूळ येथिल मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयात मराठीचे शिक्षक आहेत. त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

    Post Views:  263


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व