पाटील समाज अकोलाच्या योगायोग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Feb 2024, 11:23 AM
अकोला - ज्या घरात उपवर मुला मुलींसाठी स्थळे बघण्याची तयारी सुरु झाली आहे. त्या प्रत्येक घरात असायलाच पहिजे. अशा योगायोग नामक पुस्तकाची निर्मिती पाटील समाज अकोला तर्फे करण्यात आली आहे. रंगीत फोटोंसह मुला मुलींची अद्यावत माहिती असलेल्या या योगायोग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा स्थानिक जि.प. कर्मचारी भवनात संपन्न झाला.पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली समाज बंधू भगिनींच्या भरगच्च उपस्थितीत सदर पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, संग्रामभैय्या गावंडे, कृष्णाभाऊ अंधारे, डॉ. दिपक मोरे, ह.भ.प. वासुदेवराव महल्ले पाटील, पाटील समाजाचे सचिव तथा योगायोग पुस्तकाचे संपादक प्रदीप खाडे, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, उपाध्यक्ष विनायकराव शेळके, सुरेश गाढे पाटील, सहसचिव विजय बोरकर विचार मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी पाटील समाजाचे कार्यकारिणी सदस्य अविनाश नाकट, संदीप महल्ले, अविनाश पाटील, अँड. संतोष गावंडे, वासुदेवराव कडू,निलेश पवित्रकार, रामेश्वर सपकाळ, दिलीपराव काकोडे, प्रा. दत्तात्रय भाकरे, गजानन डिवरे यांनी अतिथिंचे स्वागत केले. पाटील समाज महिला आघाडीत नव्यानेच सहभागी झालेल्या सविता अढाऊ, वैशाली बाहाकर, प्रिया पवित्रकार गडम, अँड. दिपाली जानोरकर, ज्योती भांबेरे, श्रीमती अनुसया गोंडचवर यांच्याही हस्ते योगायोग चे लोकार्पण करण्यात आले. ही पुस्तिका न्यू अनंत मेडीकल स्टोअर्स रतनलाल प्लॉट अकोला व जनोरकर मंगल कार्यालय रिंगरोड कौलखेड अकोला येथे पालकांसाठी उपलब्ध आहे. या प्रसंगी अशोकराव अमानकर, डॉ. रणजीत पाटील, संग्रामभैय्या गावंडे. वासुदेवराव महल्ले पाटील, कृष्णाभाऊ अंधारे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास दिनकरराव सरप, रघुनाथराव खडसे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, विठ्ठलराव गाढे, श्रीकृष्ण माळी, दिलीप मानकर, शैलेंद्र काळे, सुधाकर वानखडे, धनंजय दांदळे. अरुण अमानकर, गणेशराव वसु, गजानन जानोरकर. उमेश नकासकर, राजेश ओळंबे. यांचे सह अनेक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन प्रदीप खाडे यांनी केले.
Post Views: 154