पंधरा फुट खोल बोर वेल मधे पडलेल्या माकडाला सुरक्षित रित्या रेस्क्यु करुन दिले जिवनदान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
04 Feb 2025, 10:41 AM
पिंजर पोलीस ठाण्यात असलेल्या बोरवेल अवती भवती माकडांचे टोळके कींका-या करत होते यामुळे येथील पिएसआय गजानन राहाटे साहेब यांनी जाऊन बघितले असता या बोरवेल मधे एक माकडाचे पिल्लू पडलेले दिसुन आले तेव्हा लगेच येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ पाचारण करण्यात आले पाच मिनिटातच पथकाचे जवान मयुर सळेदार,विकी पिंजरकर, मयुर कळसकार,महेश वानखडे,अभिषेक मानतकर यांनी मोठ्या शिताफिने कसोशिने 15 ते 20 फुट खोल बोरवेल मधे पडलेल्या माकडाला सुरक्षित रेस्क्यु करुन सुखरूप बाहेर काढले यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली.
Post Views: 127