धरमपेठ शिक्षण संस्था, नागपूरचा सामाजिक सेवाशिल्पी पुरस्कार


वनवासी सेवासमिती व कस्तुरी या सेवाभावी संस्थेस जाहीर
 विश्वप्रभात  28 Jul 2025, 6:47 PM
   

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील प्रख्यात धरमपेठ शिक्षण संस्थेचा यंदाचा सामाजिक सेवाशिल्पी पुरस्कार - बुलडाणा जिल्ह्यातील वनवासी सेवा समिती  आणि अकोला जिल्ह्यातील सेवाभावी संस्था कस्तुरी  या २ संस्थांना घोषित करण्यात आला आहे. जळगाव जामोद येथील सातपुडा पर्वताच्या २२ खेड्यात वनवासी कल्याण आश्रमाद्वारे आदिवासी भिल्ल व गरीब विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविली जाते तर अकोला येथील सेवाभावी संस्था कस्तुरी द्वारे डाबकी गायगांव मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अध्यात्मिक प्रकल्प उभारला असून मेळघाट परिक्षेत्रातील  वंचित व दुर्बल आदिवासी  समाजासाठी वारी शिक्षणाची, वंचितांची दिवाळी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, समाजप्रबोधनासाठी कस्तूरी व्याख्यानमाला  इ. विविध सेवाभावी उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येते. या दोन्ही सेवाभावी संस्थांना धरमपेठ शिक्षण संस्थेचा यंदाचा सामाजिक सेवाशिल्पी पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व १ लाख रुपये असे आहे. धरमपेठ  शिक्षण संस्था  नागपूर शहरातील ख्यातनाम शिक्षण संस्था असून या संस्थेचे विविध शाखांचे एकूण १३ युनिट असून या शिक्षणसंस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे ही  संस्था दरवर्षी ३ ऑगस्ट हा स्थापना दिवस सामाजिक जाणिव दिवस म्हणून साजरा करत असून या दिवशी संपूर्ण विदर्भातून निरपेक्ष व समर्पण भावाने सेवाकार्य करणाऱ्या संस्थेस सामाजिक सेवा शिल्पी पुरस्कार  बहाल करीत असते. यावर्षी वनवासी सेवा समिती आणि कस्तुरी या २ संस्थांना हा पुरस्कार ३ ऑगस्ट रोजी धरमपेठ म. पा. देव. स्मृती विज्ञान महाविद्यालयात एका सोहळ्यात  प्रदान करण्यात येईल असे धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्रख्यात विधीज्ञ श्री.उल्हास औरंगाबादकर  व पुरस्कार समिती प्रमुख डॉ. कुमार शास्त्री यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे..

    Post Views:  50


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व