खडकी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


 विश्व प्रभात  18 Aug 2026, 7:17 AM
   

अकोला :-
स्थानिक खडकी जिल्हा परिषद नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि आनंदोत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्राच्या अखंडता, एकता आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष रामराव चौधरी होते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या केंद्रीय सदस्य श्रीमती मंगला देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी तिरंग्याला अभिवादन केले.
यावेळी  गजानन पटोकार, मनोहर अहिर, डॉ. सुरेश बचे, सौ. अंजना वाणी, सौ. मीरा तरोडे, सविता शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विजय वनवे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. योगिता शेळके आणि सौ. अर्चना देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि देशाच्या विकासात नागरिकांची भूमिका यावर विचार व्यक्त केले. आयोजक
समाजसेवक गजानन हरणे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी संचालन केले. आपल्या निवेदनातून त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नसून सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव नामदेव रंगारी यांनी केले.
कार्यक्रमाला मंदाताई घोटेकर, तूपलोंढे ताई, गिरी बाई, गरजे काकू, कोकिळाबाई चौधरी, संजय पजई, जनार्दन ढोसे, विठ्ठलराव जांभुळकर, भीमराव बोरकर, रवी बोचे, अरुण शिंदे, साहेबराव काकड रामभाऊ बिरकर , जगन्नाथ शेळके,यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवत खडकी जिल्हा परिषद नगरमध्ये स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

    Post Views:  21


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख