जलालाबाद येथील डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Mar 2024, 8:21 AM
   

 बार्शीटाळकी :  बार्शीटाकळी तालुक्यातील   जलालाबाद येथे डांबरीकरणाचे काम सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाच्या सुरू असल्याचे गावकऱ्यांनी आरोप करत काम बंद पाडले आहे चिखलगाव ते  चिंचोली  रुद्रायणी  रोडवर असलेले जलालाबाद जवळील दोन किलोमीटर डांबरीकरणाचे काम  सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत काम सुरू असून हे काम एवढं निकृष्ट दर्जाचा आहे की त्यावर एक इंच सुद्धा डांबरकरण करण्यात येत नाही त्यामुळे  संतापलेल्या गावकऱ्यांनी  या कामाची खोदून पाहणी केली असता वरच फक्त अर्धा ते पाऊण इंच डांबरीकरण करण्याचे लक्षात आले असता  गावकऱ्यांनी रस्ता बंद करण्याचे विनंती संबंधित ठेकेदाराकडे केली त्यावेळेस गाव संबंधित ठेकेदाराने काम बंद केले परंतु रातोरात येऊन ते काम पूर्ण करून टाकले त्यामुळे संबंधित विभागाचे शाखा अभियंता या कामाकडे फिरकत  नसल्याचे जलालाबाद येथील गणेश थोरात यांनी तक्रार केली आहे.  

जलालाबाद येथील रोडचे काम  अंदाज पत्रकानुसार  आहे आणि मी वारंवार येऊन पाहणी केली आहे आणि काम सुध्दा पुर्ण करुन घेतले 
प्रदीप लूलोरे, शाखा अभियंता 
सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला 

जलालाबाद येथील दोन किलोमीटर रोड साठी लाखो रुपये निधी आला आहे आणि ठेकेदार व अधिकारी यांच्या संगमतीने रोड चे काम निकृष्ट दर्जाच्या सुरू आहे आम्ही रोड खोदून पाहिले तर चक्की डाबराचे थर तर नसल्यासारखेच आहे त्यामुळे काम बंद केले आहे आणि याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करणार आहे 
गणेश थोरात, ग्रामस्थ जलालाबाद

    Post Views:  95


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व