बाळासाहेब ठाकरे बोलतोय... माझ्या काळजांवर घाव घालणारांना माफी नाही...!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Oct 2022, 9:45 AM
   

माझे तमाम शिवसैनिक, माता भगीनिंनो, मी तुमचा हिंदूहृदयसम्राट बोलतोय, खरं तर मुला तुमच्याशी कां बरं बोलावं लागलं! याची कल्पना तुम्हाला आली असणार.....! मी तुमच्यातून शरीराने जरी गेलो असेल परंतू प्रत्येकाच्या मना-मनात मी निश्चीतच आहे याची मला जाण आहे. आपला आज महाराष्ट्रच नव्हे तर देश देखिल धोक्यात आहे. येथे फितुरांच्या टोळ्या कमालीच्या थैमान घालतांना दिसत आहेत. आपला भारत देश जणू गद्दारांच्या हाती गेल्या सारखे वाटू लागले आहे. जे इंग्रजाचे दलाल होते,  जे इंग्रजांशी हातमिळवणी करायचे ते आज देशभक्त बणून फिरत आहेत व त्यांना भारतातील लहान-लहान पक्ष नेस्तनाबूत करावयाचे आहेत व हुकुमशाही आणायची आहे. जणू फोडाफोडीचा त्यांनी फॉर्मुलाच राबवणं सुरु केला की, एक तर तुम्ही आम्हाला शरण या नाही तर बर्बादीला तयार व्हा! यासाठी ईडी, सिबिआय सारख्या संस्थांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग सुरु आहे. 
मी हयात असतांना माझेपुढे लोटांगण घालणार्‍यांनी माझ्या काळजाच्या तुकड्यावर हात घातला आहे, मी शिवसेनेसाठी काय-काय केले, किती खस्ता खाल्या, त्या क्रांतीकारी चळवळीला हे खल्लास करण्या निघाले आहे. माझे पश्चात माझा गळा दाबला जात आहे व तुम्ही ही षंढासारखे निमूटपणे पाहत बसले! माझा शिवसैनिक निधड्या छातीचा वाघाच्या काळजाचा आहे! अशातच या फितुरांना गद्दार जाऊन मिळाले आहेत. मला मुजरा करणारे माझा गळा दाबायला निघाले! जणू त्यांनी शिवसैनिकांच्या पुरुषार्थालाच आव्हान दिले आहे. 
सध्या जो महाराष्ट्रात तांडव सुरु आहे, हा लोकशाहीवर प्रचंड घाला आहे, मातोश्रीवर येऊन लोंटांगण घालणारे पैशासाठी, सत्तेसाठी गद्दार झाले त्यामुळे माझीच मला शरम वाटते की, मी असे ‘कडवे’ ऐवजी भडवे शिवसैनिक घडवले?
शिवसेना वाचवायला निघाल्याचं सोंग करून मी कमविलेली सेनाच तू रसातळाला घातलीस....! हा महाराष्ट्र तुला कदापीही माप करणार नाही. ़जे माझ्या शत्रुलाही जमले नाही ते या मी जवळ पाळलेल्या सापाने करून दाखवले.... छटाकभर सत्तेसाठी मराठी माणसाच्या ५० वर्षाच्या घामातून तयार झालेली मौल्यवान असा ‘शिवसेना’ पक्ष नतद्रष्ठ्यांनी नेस्तनाबूत केला. ज्या शिवसेनेने तुला भरभरून दिलं  त्याचे तू चांगले पांप फेडलेस रे!... कुठं पाप फेडशील रे अनाथा!!! हा मराठी माणूस तुला कदापीही माफ करणार नाही.
ही सुरु असलेली विकृती मुळासह उखडून फेका, या देशद्रोह्यांचे विरोधात आपणाला लढावे लागेल, पुर्वी गोर्‍या इंग्रजासोबत लढलो आता ह्या काळ्या इंग्रजासोबत लढण्यास सज्ज व्हा, माझ्या मावळ्यांनो! शिवसेना उभी करण्यामागे मराठी अस्मिता होती व शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा दबदबा होता परंतू हा दबदबा दिल्ली दरबारी पायघड्या घालून, गुलाम होऊन मुजरा घालतो आहे, हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे.
महाराष्ट्रासह देशाचा सत्यानाश करण्यासाठी ही देशविघातक टोळी उताविळ झाली आहे. त्यांना पैशाचा माज चढला आहे, त्यांना सत्तेची नशा चढली आहे, त्यांचा माज उतरवण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचे आहे. यांचा तुम्हाला बंदोबस्त तुम्हालाच करावा लागेल. मराठी माणसाला, महाराष्ट्राला वाचवा रे बाबांनो!
तुम्ही शिवरायांची मर्दाणी तलवार व भीमरायाची लेखणी घेवून देशाला वाचवू शकता. माझ्या मावळ्यांनो कोणताही देव इतरांचे घरदार पाडायला सांगत नाही. माझा उद्धव साधा आहे, त्याला असले कपटी डावपेच समजत नाही, म्हणून त्याने या अडीच वर्षात महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आशिर्वाद घेतले, कोणाचीही काहीही तक्रार दिली नाही, विरोधकही माझ्या उद्धववर प्रेम करताना मी पाहले,  तुम्ही सर्वांनी त्याचेवर भरभरून प्रेम केले. हेच दुुष्टांना पाहवले नाही, म्हणून माझ्या आत्म्याला अर्थात शिवसेनेला त्यांनी हात घातला. गद्दाराने माझ्या भोळ्या स्वभावाच्या उद्धवला बदनाम करणे लावले, त्याच्यात माझे रक्त आहे. मी तुमच्यासाठीच त्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, त्याचं हृदय माझं हृदय आहे, माझ्या जाण्यानंतर ज्यांचं-ज्यांचं मी भलं केलं ते माझ्या उद्धवला असं छळतील असं वाटलं नव्हतं. असा बदला घेतील असं स्वप्नातही विचार केला नव्हता. फुटपाथवरून उचलून मी नेतेपदार्यंत आणलं व त्यांनी माझे काय पांग फेडले! माझा आत्मा किती दु:खत असेल! माझं मन किती कळवळत असेल! मी अशा गद्दारांना कदापीही सोडणार नाही व त्यांना कधीही चैन पडू देणार नाही. 
माझा उद्धवचे ऑपरेशन झाले तेंव्हा त्याच्या मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती, त्याला श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. त्यावेळी तो तसाच राहावा म्हणून ही हरामी लोक देव पाण्यात बुडवून बसले होते. कीती बेशरमपणा म्हणायचा!
उद्धवची शस्त्रक्रिया झाल्यावर या गद्दारांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा त्याच्या शरीराची हालचाल होत नव्हती, तेव्हा ़गद्दारांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे किती वेदनादायी! माझ्या अंगावर शहारे येवू लागले.  फाटक्या माणसाला एवढी मोठमोठी पदं दिली आणि त्यांनी माझ्या  लेकरासोबत गद्दारीच नव्हे तर विश्वासघात केला. मी त्यांना सेनेत ताकद दिली ही जर माझी चूक असेल तर राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही नालायक औलाद होये! माझ्यानंतर उद्धवने सक्षमपणे शिवसेना उभी केली हेच गद्दारांच्या पोटात दुखत होतं म्हणून त्यांनी असा घात केल्ाा.
माझी प्रचंड विरोधक काँग्रेस होती, इंदिरा गांधीनी शिवसेनेवरील बंदीच्या प्रस्तावावर सही केली नव्हती. परंतू गेल्या २५ वर्षापासून मित्रपक्ष असणार्‍याने माझा गळा घोटला....! माझं चिन्ह गोठवलं....नाव गोठवलं....! असा कपटी मित्र असल्यापेक्षा दिलदार शत्रु कधीही योग्यच म्हणायल हवा.
माझ्या लेकरांनो मी धनुष्यबाणाची मनोभावे पूजा करत होतो, चिन्हही त्याच देव्हार्‍यात होते... परंतू या चाळीस डोक्याच्या कपटी रावणाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले....
हे चिन्ह माझ्या वडीलांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलं होतं. उलट्या काळच्या लोकांनी जणू माझ्या काळजावर घाव केला आहे, मला काय यातना होत असतील ....!!
प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रबोधनाबाबतचा विचार वेगळा होता, व माझा विचारही वेगळा होता, माझ्या उद्धवचाही वेगळा राहणार म्हणून उद्धवने सर्वांना सोबत घेवून चांगले काम केले. आंबेडकर जयंती असो कि रमजान ईद असो कोणाचीही तक्रार आली नाही. सर्वांना सोबत घेवून चालणारा माझ्या उद्धवचा विचार होता. तोच विचार म्हणजेच हिंदूत्व होय!  माझ्या उद्धवला तुम्हाला सांभाळायचे आहे, मी बनवलेल्या शिवसेनेला घरघर लावण्याचे पाप काही जवळच्याच लोकांनी केले म्हणून खूप दु:ख वाटते! या माझ्या शिवसेनेला दुष्टाच्या तावडीतून वाचवा! असंतुष्ट आत्मे कधीही संतुष्ट होऊ शकत नाहीत. छीनाल संस्कृती राजकारणात सर्वमान्य झाली आहे. ज्यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच जनावरांसोबत  हे संसार करू पाहत आहेत, जणू हे कोठ्यातून निघून चौकात धंदा करायला निघाले आहेत, असे वाटते.  कर्नाटक, म.प्र., बिहार, गोवा या सरकारचे काय झाले. महाराष्ट्राच्या निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. असे वाटते की, विकावू लोकांच्या हातात लोकशाही गेली आहे. याला राजकीय छिनालपणा म्हणावे लागेल. पुढच्या पिढीचे भविष्य बर्बाद होऊ नये असे वाटत असेल तर लोकशाहीचे रक्षण करा! 
१. उद्धवची मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती, श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. त्यावेळी काही लोक माझा उद्धव असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते.
२. उद्धव रुग्णालयात पूर्णपणे निश्चल झालो होतो. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं विचारलं जात होतं.
३. उद्धवची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन.
४. माझ्या उद्धवने ज्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, त्यांनी उद्धव रुग्णालयात असताना विश्वासघात केला.
५. उद्धवने हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचं आहे की २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं?
६. त्यांना ताकद दिली ही माझी चूक आहे. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे
७. विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला माझा त्यांच्या कुटुंबातला वाटतो. हे असं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी येतं आणि ते यांच्या नशिबी आलं असेल असं वाटत नाही.
८. सामान्यांना बाळासाहेबांनी असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. पुन्हा एकदा सामान्यांमधून असामान्य घडवण्याची वेळ आली आहे.
९. महाराष्ट्र फार सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना या निसर्गाची भुरळ पडत नाही, पण गुवाहाटीमधील निसर्गाची भुरळ पडते. महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्याची तुम्हाला ओढ, प्रेम नाही. त्याचं वैभव कधी दिसलं नाही.
१०. जोपर्यंत हे दिल्लीत गेले नव्हते, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेच यांना जपत आणि वाचवत आले होते. एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी, वेडापायी बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं होतं. मग दिल्लीत खुर्चीला असा काय स्प्रे मारला आहे की, ज्यांनी जपलं त्यांनाच संपवायला निघाला आहात.
११. सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब हे स्वत:चे म्हणून लोकांसमोर आणायचे. आपल्याकडून काही आदर्श निर्माण नाही झाला तर पक्ष फोडतात त्याप्रमाणे ते आता आदर्शही पळवू लागलेत.
१२. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे वेगळे करायचे आहेत.
१३. माझ्यानंतर उद्धवने शिवसेना उभी केली हेच त्यांच्या पोटात दुखतंय.
१४. शिवसैनिकांमध्येच लढाई लावून शिवसेना संपवायचा भाजपाचा डाव आहे.
१५. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व मजबूत करण्यासाठी राजकारण केलं. भाजपा राजकारणासाठी हिंदुत्व वापरत आहे. हा त्यांच्या आणि आमच्यातला फरक आहे.
१६. एक प्रसंग, गोष्ट किंवा माझा उद्धव मुख्यमंत्रीपदावर असताना घेतलेला निर्णय दाखवा की ज्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं.
१७. अयोध्येतील महाराष्ट्र भवन, तिरुपती मंदिरासाठी नवी मुंबईत दिलेली जागा, प्राचीन मंदिरांचं संवर्धन, गडकिल्ल्यांचं संवर्धन या सार्‍या निर्णयांमधून आपण हिंदुत्वापासून कसे दूर गेलो हे सांगावं.
१८. शिवसेना आणि संघर्ष हे एकमेकांच्या पाचवीला पुजलेले आहेत.
१९. जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचं ब्रिद वाक्य आहे.
२०. राजकीय पक्षांनी युती करतानाचा करार हा लोकांसमोर आणण्याचा कायदा केला पाहिजे.
२१. माझ्या उद्धवसोबत जे ठरवलं होतं ते भाजपाने नाकारल्याने महाविकास आघाडीचा जन्म झालं. नाहीतर महाविकास आघाडी झाली नसती.
२२. माझ्या उद्धवने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शिवतिर्थ पूर्ण फुलून गेलं होतं. लोक त्या निर्णयावर नाराज असते तर तिकडे कोणी आलं नसतं.
२३. आता निवडणुका घ्या. जर उद्धवने  महाविकास आघाडी स्थापन करुन चूक केली असेल तर लोक त्याला घरी बसवतील. होऊ द्या जनतेच्या न्यायालयामध्ये फैसला. आणि गद्दाराला त्याची जागा दाखवून द्या....!
२४. आम्हाला शिवसेनेवरील दाव्यासाठी पुरावा द्यायची गरज नाही. निवडणुका येऊ दे आम्ही यांनाच (बंडखोरांना) पुरुन टाकतो असं लोक म्हणतायत.
२५. ठाणेकर सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे ठाणेकर नाहीत. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नातं पालापाचोळ्याला तोडता येणार नाही.
- पंजाबराव, अकोला. 
Mob. No. 9922924684

    Post Views:  247


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व