गुरुदेव उपासक जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ प्रचारक, ज्यांचा जन्म


 संजय देशमुख  05 Mar 2023, 8:03 AM
   

गुरुदेव उपासक जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ प्रचारक, ज्यांचा जन्म दि.३०जाने.१९३०ला स्वातंत्र्य पुर्वि झाला ज्यांनी वं.महाराज यांच्या सुसंस्कार शिबिर कानडी येथे प्रथम वर्गात सहभागी होऊन ध्यान, प्रार्थना करत जा हा आर्शिवाद महाराजाचा घेऊन वयाच्या १४वा वर्षापासुन नित्यनेमाने ध्यान व प्रार्थना जपत आले.


आकोला आश्रमात ३०वर्ष सतत सेवा दिली ३०जाने २०२०पर्यत सेवा दिली नंतर कोरोणा काळात सेवा थांबली त्यांचा ९४जन्मदिवस सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा सामुदायिक प्रार्थना घेऊन आश्रमात साजरा केला ३०जाने.२०२३ला करुन सतत कार्य सुरू ठेवा खंड पाडु नका हा शुभआर्शिवाद गुरुदेव उपासक देऊन दि.२६फेब्रुवारी २०२३ ला रात्री गुरूदेव चरणी काका लिन झाले दि.२७ला अंतसंस्कार बहिरखेड येथे हजारोच्या उपस्थितीत संपन्न झाला.आज आकोला आश्रमात ५ दिवशी शुक्रवार ३मार्च रोजी एकादश दुपारी महिला मंडळ भजनाच्या कार्यक्रमाने प्रारंभ करुन नंतर ग्रामगीता अध्याय.२२अंतसंस्कार वाचन झाले ,प्रतिमा पुष्पमाला अर्पण करून सामुदायिक प्रार्थना घेऊन अनेकांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. शेवटी सार्वजनिक मौन श्रद्धांजली आत्मचिंतनाने अर्पण करुन शांती पाठ जयघोष झाला एकादश असल्याने महाआरती नंतर भजनाचा कार्यक्रम.झाला राष्ट्वंदना व जयघोष घेऊन सांगता झाली यावेळी गुरूदेव उपासिका, उपासक मान्यवर यांची उपस्थिती लाभली नियोजन भानुदास कराळे यांनी केले दरवर्षी दि.२७फेब्रुवारीला पुन्यस्मरण दिन सामुदायिक प्रार्थना घेऊन साजरा करन्याचा संकल्प केला.जयगुरू.

    Post Views:  236


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व