अथर्व मल्टिपर्पज फाऊंडेशनतर्फे गरीब गरजु लोकांना वुलन ब्लॅकेटचे वाटप


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  26 Dec 2022, 5:25 PM
   

अकोला - समाजातील वंचित, दुर्बल, पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारे कुटुंब परीस्थिती हलाखीची असल्याने शहराच्या विविध भागात रस्त्याच्या कडेला पाल वजा झोपडीत राहत असतात. हिवाळ्यात थंडीमुळे त्यांचे कुटुंबीय व त्यांची लहान मुले कुडकुडत जीवनाचा संघर्ष करतात त्यांना व त्यांचे कुटुंबीयांना कडाक्याच्या थंडीत उबदार ब्लॅकेटचे वाटप करुन व त्यांच्या लहान मुलाबाळांना वुलन टोप्या बिस्किटे चॉकलेटचे वितरण करुन त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न शहरातील अथर्व मल्टिपर्पज सेवा संस्था दरवर्षी पुढाकार घेऊन करत असते. याचाच भाग म्हणून या वर्षी सुद्धा दि. 25 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी देखील शहराच्या बाहेर विविध भागात रस्त्याच्या कडेला पाल-राहुटी टाकुन राहणारे कुटुंबाचा शोध घेऊन त्यांचे झोपडीत जाऊन 60 वुलन ब्लॅकेटचे व लहान मुलांना 100 वुलन टोप्या बिस्किटे चॉकलेटचे वाटप करण्यात आले त्यांना मदतीचा हात देण्याचा अथर्व मल्टीपर्पज फाऊंडेशनने अल्पसा प्रयत्न केला आहे. 
अनिल मुळे कुटुंबियांनी त्यांचा मुलगा स्व. अथर्वच्या संशास्यपद आकस्मिक मृत्युच्या दुखातुन सावरत अथर्वच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील वंचितांच्या सेवेकरिता त्यांचे नातेवाईक व स्व. अथर्वच्या मित्रमंडळींच्या सहकार्ऱ्याने स्व. अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था दोन वर्षांपुर्वी स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेद्वारे सतत वंचित पिडीतांची सेवा करण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्कर्ष ‌शिशुगृहातील अनाथ चिमुकल्यांना दरमहा आवश्यक असलेली औषधी पुरवणे, उन्हाळ्यात पाणपोई, पावसाळ्यात छत्री व रेनकोट वितरण, गरजुंकरीता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, रक्तदान शिबीर, सुर्योदय बालगृह व आनंद आश्रमातील अनाथ मुलामुलींना अंडरगारमेंट व चादरीचे वितरण व अन्नदान, गायत्री बालगृहातील मुलींना पादत्राणे वितरण, दिवाळीत फराळ साड्या, कपडे वाटप, वर्षभर गरजु शालेय विद्यार्थी यांना आवश्यक वह्या पुस्तके पेन वाटप, दरवर्षी सलग पाच दिवस सरकारी जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचेकरीता अन्नदान करण्यात येते व वर्षभर गरजुंना अन्नदान करणे, कोरोना काळात बेरोजगार झालेल्या शहरातील बॅड पथकाच्या कामगारांना धान्य कीटचे वितरण तसेच मास्क व सॅनिटायझर वाटप करणे, सह अनेक उपक्रम आयोजीत करुन समाजातील वंचित व गरजू लोकांची सेवा करण्याचा अल्पसा प्रयत्न केला जातो. 
या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहरराव महल्ले, पांडुरंग राऊत, चेतन राऊत, सुनिलराव मुळे, अपुर्व मुळे, विनीत चांडक, चिन्मय तायडे, अभिषेक कोपुल, अक्षय गोपनारायण, रेळे साहेब यांचे सह अथर्व फाऊंडेशनच्या सर्व सभासदांनी सहकार्य केले.

    Post Views:  135


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व