अकोला स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य प्रा. हर्षवर्धन मानकर यांच्या "प्रेयसी झाली गझल" या गझल अल्बम चे लोकार्पण १२ जुन २०२२ ला सायंकाळी ६ वाजता खुले नाट्यगृह अकोला येथे सुप्रसिद्ध बासरी वादक कृतिका जंगीनमठ यांच्या हस्ते होणार आहे. प्रस्तुत गझल अल्बम या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दिव्यांग बांधवांच्या शिक्षण रोजगार व आरोग्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. या कार्यक्रमात अकोलेकरांनी भरभरून सहभाग द्यावा कार्यक्रमाच्या प्रवेशिका व दिव्यांग नोंदणीसाठी हेल्पलाइन ९४२३६५००९० ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान प्रा. विशाल कोरडे, प्रसाद झाडे, अनामिका देशपांडे, प्रवीण पाटील, आनंद अग्रवाल, स्वाती झुनझुनवाला यांनी केले आहे.
Post Views: 322