भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून विनोद चाळके विशेष पुरस्काराने सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Jun 2026, 8:51 AM
मुंबई - भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्राकडून (NYK) घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात सहभाग घेऊन युवकांना केलेल्या उल्लेखनिय विशेष योगदानाबद्दल संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पदाधिकारी,समाजसेवी श्री.विनोद सदानंद चाळके यांचा विशेष सन्मानाने गौरव करण्यात आला.क्रीडा मंत्रालयाच्या अधिकारी (पी.आर.ओ.)सौ.श्वेता काकडे, श्री विशाल काकडे, समाजसेवक डॉ.नेमीचंद छाजेड यांच्या शुभ हस्ते हा सांताक्रूझ येथे झालेल्या भव्य सोहळ्यात चाळके यांचा या विशेष सन्मानाने गौरव करण्यात आला.या प्राप्त बहूमानाबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे समाजातून शुभेच्छांच वर्षाव होत आहे, त्यांच्या संवेदना फाउंडेशन व सहकाऱ्यांच्या मदतीने क्रीडा व शिक्षण क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या युवकांना दरवर्षी बालगौरव व युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते. त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य दिलं जात असते. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन,शिक्षण,साहित्य,नाट्य आणि फिल्म क्षेत्रातही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल जागतिक महान विक्रमाने घेतलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून युवा पिढी सक्षम होऊन जिद्दीने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित होईल. समाजाला,राज्याला तसेच देशाला त्यांच्या योगदानाचा लाभ होईल.त्यांना मिळालेल्या विशेष सन्मानामुळे समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
श्री विनोद चाळके हे आपल्या सामाजिक सेवेचा रथ गेली २१ वर्षांपासून पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न करीत आहेत.समाजातून अशा व्यक्तींना योगदान द्यायला हवे.व त्यांनी चालविलेल्या सामाजिक चळवळीला पुढे नेण्यासाठी मोलाचा हातभार लावणे गरजेचे आहे.तरच त्यांच्या या कार्याला आणखी पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळेल.अशा प्रतिक्रिया अनेक शुभेच्छूकांनी व्यक्त केल्या आहेत.
Post Views: 5