नवोदित कलावंतांना हक्काच व्यासपीठ मिळवून देणारं तरुणाई फाऊंडेशन कौतुकास पात्र - खासदार संजय देशमुख
अकोला : स्थानिक कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला येथील सामाजिक सांस्कृतिक कला संगीत साहित्य आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी तरुणाई फाउंडेशन ही संस्था गेल्या सात वर्षापासून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच साहित्यिक कलावंतांना स्वतंत्र विचारपीठ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्नशील असते. तरुणाई फाउंडेशन आजपर्यंत सात अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलने तसेच तीन जिल्हा युवा कला महोत्सव कलावंत मेळावे विदर्भ राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार वितरण सोहळा घेऊन नवोदित साहित्यिकांना हक्काच व्यासपीठ मिळून दिल आहे हे विशेष याच कामाची दखल म्हणून सन 22 .23 चा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभागाचा जिल्हा युवा पुरस्कार संस्थेला 1 मे 2025 मिळाला असून त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संदीप देशमुख व संस्थेच्या कार्याचे तोंड भरून कौतुक नुकतेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केले तसेच त्यांना अभिनंदन पत्र सुद्धा दिले आहे त्यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल दाहेलकर प्रा.गणेश मेनकार डॉ. किरण वाघमारे मंजु झाबंरे तथा संस्थेचे सर्व सदस् गण उपस्थित होते.
Post Views: 71