पोलिस आणि सामाजिक नेत्यांच्या यशस्वी वाटचालीचं खरं श्रेय हे त्यांच्यासोबतच पत्नी आणि कुटूंबियांना असते.....खासदार राजन विचारे


पोलिस उप अधिक्षक संजय धुमाळ यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार समारंभाला अधिकारी आणि लोकस्वातंत्र्य पदाध
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Feb 2024, 11:16 AM
   

ठाणे-- पोलिस हे समाजावरील अन्यायांचा प्रतिकार करून त्याला खरा न्याय देणारे कर्तव्यतत्पर अधिकारी तर असतातच पण या समाजाशी येथील मातीशी नाळ जुळवून ऋणानुबंध निर्माण करणारे संवेदनशील सेवाव्रती असतात.संकटांशी सामाना करत अनेकांच्या चेहऱ्या हास्य पुरविणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा सर्वात जास्त त्रास हा त्यांची पत्नी,आई वडील आणि कुटूंबाला होत असतो.ते हे सर्व सहन करतात म्हणून कर्तव्यतत्पर हे यशस्वी कारकिर्दीचे समाजाच्या गौरवाला पात्र होत असतात.असे भावोत्कट प्रतिपादन शिवसेना खासदार मा.राजन विचारे यांनी पोलिस ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उप अधिक्षक मा.संजय धुमाळ यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात केले.
               दि.१ मार्च रोजी संजय धुमाळ सेवेतून निवृत्त होणार आहेत.त्या निमित्ताने समाजाच्या आणि सामाजिक नेत्यांच्या हृदयात आपल्या विश्वासपात्र प्रामाणिक वागणूकीने प्रेमाचे स्थान मिळविणाऱ्या धुमाळ  अधिकाऱ्यांचा ठाण्यातील चांगभले ग्रूप सोने,सातारा यांच्या वतीने भव्य दिव्य अशा दिमाखदार सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.या भावनिक प्रसंगी त्यांच्या पत्नी सौ.सुजाता धुमाळ आणि वडील नारायणराव धुमाळ यांचाही सत्कार करण्यात आला.ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पोलिस महानिरीक्षक शेखर,विशेष सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे, माजी पोलिस महानिरीक्षक रामराव पवार,पोलिस उपायुक्त उत्तम सोनवणे,अनेक लोकप्रतिनिधी,पोलिस अधिकारी प्राधान्न्याने उपस्थित होते.हे सर्व अधिकारी संजय धुमाळ १९९५ साली पोलिस दलात दाखल झाले तेव्हा त्यांची कारकीर्द पाहिलेल्या अकोल्यातील पोलिस अधिक्षक होते.  
         सर्व अधिकाऱ्यांनी आपत्तींचे सामने करीत दरोडेखोर,अट्टल गुंड आणि अनैतिक प्रवृत्तींना जेरबंद करण्याच्या आणि ईतर सर्व कारवायांमध्ये संजय धुमाळ यांचे त्यांच्या पोलिस दलात प्रथम क्रमांकाचे अधिकारी कसा नावलौकिक होता याबाबतचे अनुभव सांगून त्यांच्या सामाजिक स्नेहबंध सांभाळण्याच्या यशस्वी कौशल्याचे समर्पक शब्दात मुल्यमापण करून गौरव केला.त्यांचेकडे पाहून ते निवृत्तीचं झाले हे मनाला पटत नाही. असं मत व्यक्त करून आगामी काळात सामाजिक सेवेतून निवृत्त होणार नाहीत म्हणून आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाला संजय धुमाळ यांच्या विशेष निमंत्रणावरून अकोल्याहून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख अरविंदराव देशमुख,महाराष्ट्र राज्य संघटन व संपर्क प्रमुख महाराष्ट्र २४ न्यूज चॕनेलच्या अमिता कदम हे पदाधिकारी उपस्थित होते.त्यांचे स्नेही स्टेट बॅंकेचे निवृत्त व्यवस्थापक  चंद्रकांत खेडगीकर हे या कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख होते.विश्वास धुमाळ यांनी प्रास्ताविकातून शेती आणि मातीशी नाळ जुळविताना अधिकारी म्हणून प्रास्ताविकातून संजय धुमाळ यांचा गौरव केला‌.
            या प्रसंगी गडकरी रंगायतन हे  उपस्थितांनी गच्च भरलेले होते.कार्यक्रमाला त्यांच्या ठाणे,कोकण सातारा,विदर्भ आणि ईतर ठिकाणावरून जमलेली गर्दी  ही संजय धुमाळ यांनी पोलिस दल आणि समाजाच्या  अंतर्मनामध्ये अधिराज्य निर्माण केल्याची साक्ष असल्याची मतं अनेक वक्त्यांनी व्यक्त केली.

    Post Views:  109


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व