नवीन शैक्षणिक धोरण गोरगरीब बहुजनांच्या विरोधातील, या लढाईत मी जनतेसोबत आमदार किरण सरनाईक यांचे प्रतिपादन.


 संजय देशमुख  2022-06-12
   

 अकोला: नवीन शैक्षणिक धोरण सर्वसामान्य, गोरगरीब बहुजनांच्या विरोधातील व त्यांना संपवणारे कटकारस्थान असून या कटकारस्थानाचा विरोधात मी जनतेच्या सोबत असल्याचे प्रतिपादन शिक्षण नीती आंदोलन समन्वय समिती. अकोला च्या वतीने रविवार दिनांक 12 जुन 2022 ला राज्यव्यापी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या विषयावर जनतेशी संवाद कार्यशाळेचे उदघाटन भाषण करताना शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी प्रतिपादन केले. 

स्थानिक उस्माना आझाद उर्दू हायस्कूल व के .एम . आसगर हुसण शिक्षण महाविद्यालय रतनलाल प्लॉट अकोला येथे या राज्यव्यापी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहले होते. या कार्यशाळेचे उदघाटन शिक्षक
 आमदार माननीय किरण सरनाईक यांच्या शुभहस्ते पार पडले . कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्याम मुंडे अध्यक्ष सत्यशोधक शिक्षण सभा महाराष्ट्र, स्वागताअध्यक्ष माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन , प्रमुख उपस्थिती विजय कौशाल, इसाक सय्यद राही, संयोजक सुरज मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद इंगळे तर आभार प्रदर्शन समाज सेवक गजानन हरणे यांनी केले ही कार्यशाळा सकाळी अकरा वाजता सुरू होऊन पाच वाजेपर्यंत चालली नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता यावेळी या विषयावर बोलणारे तज्ञ मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले .गटचर्चा झाली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हे धोरण उपस्थितांनी समजून घेतले. उपस्थित जागृक नागरिक , महिला युवक-युवतींनी या कार्यशाळे मध्ये पुढील ॲक्शन प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरले . अशी माहिती गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनांदोलन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

    Post Views:  506


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व