निर्माण मल्टीस्टेटचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्सलन्स अवार्डने सन्मानित
संस्थेला यापूर्वी सलग 10 वर्षे मिळाला बँको पुरस्कार
अकोला : गत 12 वर्षापासून सहकार क्षेत्रात आपल्या शिस्तबध्द, पारदर्शक व्यवहाराने सभासद व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरुन सुदृढ आर्थिक स्थिती असणाऱ्या निर्माण मल्टीस्टेटचे अध्यक्ष गणेशराव देशमुख यांना नुकताच 2024 चा आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्सलंस अवार्ड अजरबाईजान या देशात बाकु येथे 19 डिसेंबर 2024 रोजी प्रदान करण्यात आला.
निर्माण मल्टीस्टेटची स्थापना 2013 मध्ये झाली असून संस्थेच्या 8 शाखा कार्यरत असून संस्थेच्या सद्या ठेवी रुपये 100 कोटी आहेत. संस्थेने केलेला कर्जपुरवठा सुरक्षित असून एकूण कर्ज वाटपामध्ये 60% गोल्डलोन वितरीत केले आहे. संस्थेच्या नियमित वसुलीमुळे संस्थेचा एन.पी.ए. शुन्य टक्के आहे. तसेच संस्था मोबाईल ॲप, क्युआरकोड, फंडस् ट्रान्सफर, मिनी एटीएम, इलेक्ट्रीक बील भरणा, लॉकर इत्यादी सुविधा देत आहे. संस्था कमी व्याजदरामध्ये ज्यादा गोल्ड लोन, गोल्ड किंमतीच्या दुप्पट कर्ज, तसेच सोने खरेदीसाठी कर्ज, व व्यवसाय वाढीसाठी कर्जपुरवठा करीत असून, मुदती ठेवीवर 10% व्याज देत आहे. करिता ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगीतले.
तसेच संस्थेला यापूर्वी सलग 10 वर्षे बँको पुरस्कार मिळालेला आहे. संस्थेस मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे सभासद, ग्राहक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना असल्याची भावना अध्यक्ष गणेशराव देशमुख यांनी व्यक्त केली. सदर पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष गणेशराव देशमुख यांनी सपत्नीक स्विकारला. अशी माहिती बँकेच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
Post Views: 160