अकोला : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा दि. 14 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे. त्यात 1 हजार 882 पदे भरण्यात येणार आहेत.
जिनस इंडीया, पिंपल ट्री वेंचर, जाधव ग्रुप ऑफ कंपनी, एलआयसी,अमरावती, कल्पतरू स्किल डेव्हलपमेंट ॲकॅडमी,नाशिक,.रेडियंट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सनसाईन सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, स्वतंत्र मायक्रो फीन, ई.सी.ई. इंडिया एनर्जी, संसुर सृष्टी इंडीया, संजीव ऑटो पार्ट मॅन्युफॅक्चरिंग, छत्रपती संभाजीनगर, कोअर प्रोजेक्ट इंजिनिअरिंग अॅण्ड कंन्सलंट प्रा.लि.अमरावती १३.पठले एज्यूस्किल फाऊंडेशन प्रा.लि.नागपुर १४. द युनिव्हर्सल ग्रुप, नागपुर,. पियाजियो व्हेईकल्स, बारामती, उद्योगमित्र कन्सल्टन्सी आदी उद्योग, आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. पाचवी, दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण आदी पात्रता असलेल्या युवक व युवतींना अर्ज करता येईल.
मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदविण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. आपल्या सेवायोजन कार्डाचा आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदासाठी अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे, दि. 14 फेब्रुवारी रोजी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा तसेच पासपोर्ट आकारातील फोटोसह स्वखर्चाने श्री शिवाजी महाविद्यालय, अमरावती येथे उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दू. क्र. ०७२४-२४३३८४९ किंवा ९६६५७७५७७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Post Views: 98
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay