माँ गायत्री ज्येष्ठ नागरीक संघ कडुन जागतीक महिला दिन साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Mar 2026, 8:26 AM
   

माँ गायत्री ज्येष्ठ नागरीक संघा मार्फत रविवार दिनांक 8 मार्च 2026 ला जागतीक महिला दिन  साजरा करण्यात आला. कार्यक्रमची सुरवात माँ साहेब जिजाऊ यांचे प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती कमलाताई बलोदे माजी शिक्षण सभापती मनपा अकोला, प्रमुख अतिथी योगीताताई गणेश पावसाळे, सदस्या स्थायी समिती मनपा अकोला मंगलाताई गजानन सोनोने माजी नगरसेविका, उज्वलाताई धनंजय धबाले, दिपालीताई आनंद बलोदे, उषाताई ठाकरे व आशाताई मांगुळकर संचालीका यांचे हस्ते महिला दिनाचे औचित्य साधुन विशेष कार्य, उल्लेखनीय काम, सामाजीक/धार्मीक कार्य, गरीब व होतकरु कष्टकरी महिला सिंदुताई पदमावार, बबीताताई सर्जेकर, चित्राताई ठाकरे उज्वलाताई परनाटे व ईशा पाटील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमला उपाध्यक्ष रामदयाल इंगळे, सचिव अशोक मांगुळकर, शामराव ठाकरे, नितीन ठाकरे, राजाराम उपाध्याय उपस्थित होते.

    Post Views:  11


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व