एच आय व्ही एड्स कायदा 2017....


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Dec 2022, 8:47 AM
   

स्वप्निल देशमुख (जिल्हा प्रतिनिधि बुलढाणा)  : भारतात एच आय व्ही एड्स चा पहिला रुग्ण 1986 मध्ये आढळला एच आय व्ही च्या विषाणूचा शोध 1983 मध्ये डॉ ल्युक मोंटेगनियर फ़्रेंच आणि डॉ रॉबर्ट गँलो अमेरिका यांनी लावला. एच आय व्ही म्हणजे हुयमन इमूनवडिफेशियशी व्हायरस  एड्स आकवायर्ड इमिनोडीफिशयांशी सिंड्रोम  एच आय व्ही हे विषाणू आहे तर त्यापासून एड्स  हा आजार होतो
एच आय व्ही  कशा मूळे होतो, एच आय व्ही बाधित स्त्री पुरुषांसोबत असुरक्षित शारीरिक संबंध, एच आय व्ही बाधित रक्त घेतल्यास, एच आय व्ही बाधित व्यक्तीची सुई सिरिन्ज वापर केल्यास, एच आय व्ही बाधित गरोदर स्त्री पासून तिच्या होणाऱ्या बाळास...

लक्षणे :
एकसारखा ताप
वजनात 10 टक्के घट
तोंडात घशात फोड येणे
भूक कमी होणे
अतिसार एक।महिन्यापेक्षा जास्त कालावधी
गुप्तरोग 
क्षयरोग
असे लक्षणे असले तरी जोपर्यंत आपण रक्त तपासत नाही तो पर्यंत कोणालाही एच आय व्ही एड्स बाधित म्हणू शकत नाही
रक्ततपासणी : एच आय व्ही एड्स ची लक्षणे दिसत असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयातीळ एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी विभागातील ICTC यांचे कडे जाऊन समंती पत्र देऊन एच आय व्ही चाचणी करावी ही चाचणी पूर्णतः गोपनीय असून मोफत असते ICTC समुपदेशक हे त्याचे समुपदेशन करतात आणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे रुग्णाच्या तीन तपासण्या करतात त्या रुग्णाला एच आय व्ही बाधित असल्याचा अहवाल त्यांना देतात।

औषधोपचार...
एच आय व्ही बाधित व्यक्तीला ART सेंटर येथे औषधोपचार घ्यावा लागतो हा औषधोपचार आयुष्य भर घ्यावा लागतो. एच आय व्ही एड्स बाधित गरोदर स्त्री आढळल्यास तिला तात्काळ तिला ART औषधे द्यावे लागतात  तिच्या कडून जन्म झालेल्या बाळाला 45 दिवस ते 90 दिवसाचे नेविरपिन औषधे द्यावी  लागतात म्हणजे ते बाळ एच आय व्ही negative येण्यास मदत होते तसेच त्या बाळाची 45 दिवस  6 महिने 12 महिने 18 महिने अशा 4 तपासणी कराव्या लागतात या दरम्यान बाळ बाधित आल्यास त्याला Art औषधे सुरू करावी लागतात एच आय व्ही एड्स कायदा 2017...
आपल्या भारत देशामध्ये एच आय व्ही एड्स कायदा 2017 हा 10 सप्टेंबर 2018 पासून लागू झाला आहे. तशी घोषणा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली. हा कायदा एच आय व्ही एड्स चा प्रसार रोखण्यासाठी तसेच त्याला नियंत्रित करण्याकरीत  प्रयत्न करण्यासाठी बनविण्यात आला आहे एच आय व्ही एड्स ग्रस्त व्यक्ती वर भेदभाव करण्यास प्रतिबंध करणारा हा कायदा आहे हे त्यांचे उपचार आणि त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याविषयी महितीपूर्ण समंती आणि गोपनीयतेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे
हा कायदा 11 एप्रिल 2017 साली संसदेत मंजूर करण्यात आला होता रोगावरील प्रतिबंध आणि नियंत्रण तसेच त्यावरील प्रभावित मानवी हक्काचे संरक्षण यासाठी ही तरतूद करते.
या कायद्यामुळे  रोजगार आणि कामाच्या ठिकाणी एच आय व्ही एड्स ग्रस्त रुग्ण असल्या कारणास्तव अशा प्रकारच्या कोणत्याही भेदभावावर देखील  बंदी घालण्यात आली आहे. 
या कायद्या प्रमाणे  एच आय व्ही एड्स ग्रस्त  व्यक्ती सोबत शिक्षण वैद्यकीय सेवा घर विक्री किंवा भाड्याने देणे विमा इत्यादी मंध्ये भेदभाव करता येणार नाही या करणावरून नोकरीतुन काढता येणार नाही किंवा कोणत्याही शैक्षणिक सुवीधा किंवा आरोग्य सेवा मिळविण्यासाठी एच आय व्ही एड्स तपासणी ची अट घालता येणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीला एड्स असल्याची माहिती त्याच्या परवानगी शिवाय किंवा न्यायालयाच्या परवानगी शिवाय उघड करता येणार नाही.
या कायद्याने एच आय व्ही असलेली व्यक्ती तिच्या सोबत राहणारी व्यक्ती यांच्या बद्दल द्वेश निर्माण करण्याचे कृत्य करणाऱ्या ला 2 वर्षा पर्यन्त करावास तसेच 1 लाख रुपयांचा दंड करण्याची तरतूद या कायद्यात आहे.
एड्सग्रस्त व्यक्ती ज्या प्रकरणात तक्रारदार आहे अशा प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी तरतूद या कायद्यात आहे ही प्रकरणे प्राधान्याने निकाली काढणे तसेच एड्सग्रस्त व्यक्तीला शिक्षा झाल्यास जिथे आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी त्याला ठेवण्यात आले पाहिजे.

या करीता प्रत्येक शासकीय निमशासकीय संस्थेत एकाची तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना विशेष सुविधा देण्यात येतात. अशा प्रकारे एच आय व्ही एड्स कायदा 2017 मुळे एच आय व्ही एड्स बाधितांना मदत दिली आहे.
गजानन भास्करराव देशमुख
जिल्हा पर्यवेक्षक, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग जिल्हा रुग्णालय बुलढाणा

    Post Views:  245


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व