पद्मश्री डॉ.मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार २६ जाहीर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Apr 2026, 1:49 PM
   

उरुळी कांचन : पद्मश्री डॉ मणी भाई देसाई प्रतिष्ठान क्रीडा युवक कल्याण मंत्रालय, नीती आयोग, एम एस एम इ उद्यम मंत्रालय भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने समर्पित भावनेने कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झालेले आहेत. हे पुरस्कार दिनांक २७ एप्रिल२०२६ रोजी सोमवारला सायंकाळी सहा ते आठ च्या दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह येथे होणार आहेत. मॅगसेस अवॉर्ड विजेते पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई यांच्या जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे व समर्पित भावनेने कार्य  करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंगसेवक ,वृक्षमित्र ह भ प डॉ रवींद्र भोळे यांनी प्रतिनिधी जवळ कळविले आहे. या कार्यक्रमाला नामदार श्री रवींद्र साठे खादी आणि ग्रामोद्योग मंत्री स्वतंत्र कार्यभार मंत्रालय मुंबई, यांचे हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विकास वारके उपाध्यक्ष महाराष्ट्र लेवा पाटीदार  महासंघ,   कृष्णाजी त्र्यंबक खडसे सल्लागार लेवाभ्रातृ मंडळ पिंपळे सौदागर, अनिल बोंडे अध्यक्ष भातृ मंडळ पुणे, जितेंद्र बडेकर सभापती समाज कल्याण पुणे जिल्हा परिषद, सुरेश कांचन मुख्याध्यापक संत यादव बाबा हायस्कूल, ह भ प सुरेश कांचन शिक्षक पुरोगामी विद्यालय ,सुभाष कट्यारमल कोरेगाव भीमा , राष्ट्रीय पत्रकार प्रल्हाद खर्चे, प्रमोद सूर्यवंशी संपादक आम्ही मुंबईकर , ममता यशवंत पाटील स्वीय सहाय्यक खादी व ग्रामोद्योग मंत्रालय महाराष्ट्र शासन,हे उपस्थित राहणार आहेत . यावर्षी जाहीर झालेल्या राष्ट्रसेवा पुरस्कारामध्ये प्रो.
 डॉ. भरतसिंह (शैक्षणिक कार्य) ग्रेटर नोएडा युपी,  डॉ भावार्थ रामचंद्र देखणे( आध्यात्मिक कार्य) मुख्य विश्वस्त संत ज्ञानेश्वर देवस्थान आळंदी पुणे, विजय वासुदेव खर्चे (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सामाजिक) अकोला, जितेंद्र बच्चन (पत्रकरिता सामाजिक चिंतन) दिल्ली एनसीआर, डॉ. काशिनाथ व्ही बराटे (शैक्षणिक सामाजिक) परतवाडा, बापूराव बबन चौधरी( पत्रकारिता, पत्रकार दैनिक महाराष्ट्राची भूमी) सोरतापवाडी पुणे, रुपेश ताओरी(शैक्षणिक) पुणे, जयश्री पुरुषोत्तम पाटील( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, पी आय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स )ठाणे, फकीरा भगवान राजगुरू (शैक्षणिक साहित्यिक )पिंपरी माळी बुलढाणा, सौ विद्याताई यादव (शैक्षणिक संचालक संत यादव हायस्कूल) शिंदवणे, दत्ता श्रावण खंदारे( संपादक पत्रकरिता भगवे वादळ )मुंबई, डॉ. लक्ष्मण माधवराव शिवनेकर (शिक्षणातज्ञ साहित्यिक )मुंबई, राम मिस्त्री (साहित्यिक राजपत्रित अधिकारी) ठाणे , श्रीमती रश्मी नरेंद्र जोशी (सामाजिक पर्यावरण कार्य) मुंबई, डॉ. स्मिता विनायक सहस्रबुद्धे (कवियत्री साहित्यिक) रायगड, श्री प्रदीप श्रीकृष्ण पुराणिक( अध्यात्मिक शैक्षणिक) चाळीसगाव, किरण लक्ष्मण तोडकर (साहित्यिक) सातारा, वसुंधरा प्रदीप निकम (साहित्यिक )सातारा, अविनाश वसंतराव शिंदे (आरोग्यसेवा) सातारा, किरण तुकाराम शिर्के (आध्यात्मिक कार्य), प्रवीण रमेश काळकुटे (लेखकसाहित्यिक )बीड, नरेंद्र साहेबराव खंडारे (साहित्यिक) बुलढाणा, विष्णू नामदेव पाटील (अध्यात्मिक) दिघी भोसरी, प्रियल प्रधान (नृत्यकला) ओडिसा सीतापुरी नई दिल्ली, विभावरी निलेश इंगळे, (सामाजिक कार्य )आकुर्डी पुणे, प्रल्हाद हरी बढे (आध्यात्मिक) वडगाव शेरी पुणे, डॉ. हरी निवृत्ती पाटील( अध्यात्मिक पशुसेवा) औंध पुणे, सौ विजया कौतिक जंगले (सामाजिक) प्राधिकरण निगडी, सौ नीता यशवंत वायकोळे (सामाजिक) अकोला, अविनाश गजानन दीक्षित (सामाजिक )बोरी एंनदी दौंड, वैद्य उद्धव ज्ञानदेव साळुंखे( योग आयुर्वेदा) सादलगाव शिरूर, दिलीप गोविंदराव डहाके (छंद स्वाक्षरी) पुनावळे पुणे, जयंत निळकंठ भोळे (योगशिक्षक )नाशिक, सौ भाग्यश्री पवन कुमार कट्यारमल( दिव्यांग सेवा) शिरूर, सौ अर्चना शशिकांत धूरदेव( मुख्याध्यापिका मतिमंद सेवा) लोणी काळभोर, सौ आरती शशिकांत गाडेकर ( दिव्यांग सेवा )पुणे, विठ्ठल लक्ष्मण काटे (निवृत्त अधिकारी सामाजिक )पुणे, सुनंदा चंद्रकांत प्यारम मॅडम (लेखाधिकारी समाज कल्याण) पुणे, सुनील भगतसिंग परदेशी (दिव्यांग सेवा )जि प पुणे, डॉ.कांचन श्रीकांत दारमोडे (वैद्यकीय सेवा) मुंबई, श्री उमेश पांडुरंग चोरे (शैक्षणिक )अकोट अकोला, योगेश कैलास भोस (उद्योग क्षेत्र )कोंढापुरी पुणे, डॉ. विजय अशोक साळवी (आरोग्य सेवा )राहुरी अहिल्यानगर, गणेश राजेंद्र चव्हाण (सामाजिक कार्य) शिक्रापूर शिरूर पुणे, चंद्रकांत शामराव मावळे (आधुनिक तंत्रज्ञान) चिंचवड, जगदीश श्रीराम धूत (कृषी सेवा )शेवगाव अहिल्यानगर, संदीप किसन सरोदे (उत्कृष्ट निवेदक सामाजिक) सरदवाडे शिरूर पुणे, अंकुश तुकाराम भोरडे (अपंग सेवा सामाजिक )पिंपरी सांडस शिरूर , ह भ प सौ मीनाताई आप्पासाहेब गडके (कीर्तन सेवा आध्यात्मिक)  अहिल्यानगर, काकासाहेब प्रल्हाद गोबरे (सामाजिक देशसेवा) खानापूर अहिल्यानगर, विनोद शिवाजी वाडेकर (कृषी सेवा सामाजिक) अहिल्यानगर, मारुती धोंडीबा सातपुते (कृषी सेवा) वळणे मुळशी पुणे, रामराव नामदेव गोबरे (कृषी तज्ञ )खानापूर अहिल्यानगर, सुषमा अनिल पवार( दिव्यांग सेवा सामाजिक ) सातारा, ह भ प शिवशाहीर कल्याण रामराव काळे (जनजागृती कार्य) भामकुळ अहिल्यानगर, अंबादास कारभारी कळमकर (कृषी तज्ञ )आव्हाने अहिल्यानगर, ह भ प राम महाराज झिंजुर्के (कीर्तनकार अध्यात्मिक कार्य)आखेगाव अहिल्यानगर, विवेक भागचंद्र शेलार (शैक्षणिक) श्रीगोंदा, खेमगर वसंत बाळू (शैक्षणिक) आष्टी, सौ रेणुका रवींद्र पातारे (शैक्षणिक )गोरेगाव, शहाजी भिकाजी शेळके (शैक्षणिक) श्रीगोंदा, शरद आनंदराव पवार (शैक्षणिक )मुंबई, संतोष शेरकर (सामाजिक )गोरेगाव, ह भ प श्री विठ्ठल महाराज खेडकर (अध्यात्मिक )श्रीगोंदा, समीर वसंतराव निंभोरे (शैक्षणिक) घोटवी गणेश सुधाकर दहिवळे (शैक्षणिक) पारगाव, हिरामण शेठ जगताप (सामाजिक )काष्टी, दीपिका संताजी साळवे (सामाजिक शैक्षणिक )मेजर संदीप विलास दिवेकर( कृषी सेवा सामाजिक) कानगाव, धनेश्वर पतंगराव भोस (सामाजिक शैक्षणिक) मोशी, हेमलता प्रदीप गीते (सामाजिक साहित्यिक )अहिल्यानगर, सरोज प्रभाकर अल्हाट (सामाजिक फ्री प्रेस लॉन्सर) अहिल्यानगर, डॉ. शैलजा शंकरराव करोडे (साहित्यभूषण) मुंबई नेरूळ, , श्री रज्जाक मजनू भाई शेख (सामाजिक) श्रीरामपूर, अहिल्यानगर, अहमद पिरण साहब शेख , (कवी लेखक गीतकार )हिंगोली श्रीराम विद्यासागर घडे कवी (लेखक गीतकार) डुमरनवाडी परभणी, सुरज हरिलाल शर्मा (सामाजिक) केडगाव, रमेश एन निखार ( सामाजिक )दौंड, विनोद नवल पवार (शैक्षणिक) पुणे, स्मिता सत्यम शिर्के (शैक्षणिक) पुणे, मिस्टर शकील झारी( संगीत कला) बारामती पुणे, जयप्रकाश आढाव  (सामाजिक )पुणे वरील प्रमाणे राष्ट्रीय राज्य पातळीवरील पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झालेले आहेत. स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र पुष्पगुच्छ ,शाल असे पुरस्काराचे स्वरूप राहील असेही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक वृक्षमित्र हभप डॉ.रवींद्र भोळे हिंदू रत्न पुरस्कार विजेते यांनी पत्रकार द्वारे कळविले आहे. हा कार्यक्रम दि. २७एप्रिल २०२६ रोजीसायंकाळी सहा ते आठ दरम्यान सोमवारला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह फायर ब्रिगेड जवळ टिंबर मार्केट भवानी पेठ येथे होणार आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहतील असेही पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे..

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व