मंडळी, दैनंदिन आयुष्यातील घडामोडींमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे प्रवास करावे लागतात. कधी ते कमी अंतराचे किंवा पल्ल्यांचे असतात. तर कधी ते दीर्घ पल्ल्यांचे आणि कमी विसाव्याचे असतात. अशा एखाद्या विसाव्याच्या क्षणी आपल्याला घोटभर चहा किवां नाश्ता वगैरे काही मिळाले तर ते हवेच असते. त्याची गरजही असते आणि त्यावेळी त्याची चवदेखील चांगलीच लागते. हा झाला रोजच्या आयुष्यातील आपला अनुभव हा असाच अनुभव आपण आयुष्याच्या प्रवासाबद्दल लक्षात घेतला तर असेच काहीसे घडत असल्याचे लक्षात येऊ शकते.
आयुष्य हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. अनेक टप्पे या प्रवासात आपल्याला पार करायचे असतात. पल्ला मोठा असतो आणि त्यामुळे आपण सतत चालत राहिलो तर स्वाभाविकपणे थकतो आणि तेथे विसावतो. या प्रवासात आणखी एक रेस्टॉरंट आपल्याला दिसतं. त्याही रेस्टॉरंटमध्ये आपल्याला लावंच लागतं. तेथील पदार्थांची चव काही वेगळीच लागते. या रेस्टॉरंटचे एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे आपल्याला कसलीही काही ऑर्डर द्यावी लागत नाही. या रेस्टॉरंटचं नाव असते कर्म. या कर्म नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला काहीच ऑर्डर करावे लागत नाही. तेथे आपल्याला मेन्यू कार्ड पाहून काही मागवावे लागत नाही. या रेस्टॉरंटमध्ये तेच पदार्थ आपल्याला मिळतात, जे आपणच आपल्या वर्तनातून शिजवलेले असतात किंवा जे पदार्थ आपल्या कृतीमधून, विचारांमधून तयार झालेले असतात.
Post Views: 136