अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी स्थळाच्या २५ कोटींचा विकास आराखडा मंजुर*
*मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईस्थित सह्यांद्री अतिथीगृह येथे २० जुलै रोज
*समाधी स्थळांचा चेहरामोहरा बदलून पर्यटनाला मोठी चालना मिळणार- आ.सौ. सुलभाताई खोडके*
*समाधीचा जीर्णोद्धार ,कीर्तन सभागृह व ध्यान केंद्रासह कुंताबाई समाधीचे होणार सुशोभीकरण*
अमरावती( प्रतिनिधी ) दिनांक १२ ऑगस्ट :- विदर्भातील प्रमुख धार्मिक व सामाजिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रचलित असलेल्या अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी स्थळ परिसराच्या सुशोभीकरणासाठी एकूण २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात मागील २० जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई स्थित सह्यांद्री अतिथीगृह येथे आमदार - सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. .
या निधीमुळे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या समाधी स्थळांचा धार्मिक चेहरामोहरा बदलणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.दरम्यान मुखयमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत संत गाडगेबाबा विकास आराखडा बाबत सादरीकरण देखील करण्यात आले असून या अंतर्गत संत गाडगेबाबा समाधीचा जीर्णोद्धार व परिसराचे सौंदर्रीईकरणासह कुंताबाई समाधीचे सुशोभीकरण, कीर्तन सभागृह व ध्यान केंद्र तसेच विलोभनीय उद्यान अशी अनेक कामे अंतर्भूत असल्याची माहिती आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांनी दिली आहे.
थोर आधुनिक मराठी संत व समाज सुधारक संत गाडगेबाबा यांनी समाजातील अज्ञान , अंधश्रद्धा व अनिष्ट चालीरीती यांचे उच्चाटन करण्यासाठी निरपेक्ष लोकसेवेचे ,लोकशिक्षण व लोक कल्याणाचे व्रत स्वीकारले. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. अमरावती येथील गाडगे नगर स्थित संत गाडगेबाबा समाधी स्थळ हे बाबांच्या क्रांतिदर्शी विचार व समाज प्रबोधनाची साक्ष देत असून हजारो अनुयायांचे ते प्रेरणास्थान बनले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा यांचे साहित्य व स्मृतीचे जतन करून समाधी स्थळाचा तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी अमरावतीच्या आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विकास आराखडा मंजूर करून निधी देण्याची मागणी केली. याची फलश्रुती म्ह्णून गेल्या सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात संत गाडगेबाबा यांचे गाडगे नगर येथील समाधी स्थळ असलेले तीर्थक्षेत्रासाठी रुपये २५ कोटींच्या निधीबाबत घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान गेल्या २० जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री - नामदार देवेन्द्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई स्थित सह्यांद्री अतिथीगृह येथे आमदार - सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीमध्ये अमरावती येथील संत गाडगेबाबा तीर्थस्थळाच्या विकास आराखडा बाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सद्यस्थितीतील समाधीस्थळ येथील पूर्ण कामे,अर्धवट कामे यासह प्रस्तावित समाविष्ट कामासंदर्भात बैठकीमधून चर्चा केली. यावर मुख्यमंत्री महोदयांनी श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देऊन या निधी अंतर्गत सर्व उर्वरित व प्रस्तावित कामे गतीने पूर्ण करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनासोबत दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधून निर्देशित केले होते.
या अंतर्गत आता संत गाडगे बाबा समाधी स्थळ येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. ज्यामध्ये श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्रचे उर्वरित बांधकाम पूर्ण केले जाणार आहे तसेच स्मृती भवन परिसरात 'शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर'च्या तळमजल्याचे नवे बांधकाम. भाविकांच्या सोयीसाठी यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम. प्रबोधनासाठी अद्ययावत कीर्तन सभागृह व ध्यान केंद्र इमारत., अंतर्गत रस्ते , वाहनतळ आणि आकर्षक उद्यान उभारण्यात येतील. या निधीमुळे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या समाधी स्थळांचा धार्मिक चेहरामोहरा बदलणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
संत गाडगेबाबा समाधी स्थळाच्या विकासा आराखडा करिता शासनाने २५ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रावाहिनी अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
Post Views: 5