लागोपाठ येणाऱ्या शासकीय सुट्यांमध्ये महापुरूषांना विसरणारे अधिकारी...!


मुख्यालयी येण्याचे टाळल्याने अन्न व औषध प्रशासनासह अनेक शासकीय विभागात आंबेडकर जयंतीला दांडी..!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Apr 2025, 10:40 AM
   

अकोला - लागोपाठ येणाऱ्या शासकीय सुट्या सलग उपभोगण्याचा मोह न आवरल्याने अनेक शासकीय कार्यालयात यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची व महात्मा फुले या महापुरूषांच्या जयंत्या  साजऱ्याच झाल्या नसल्याने हे दोन्ही महापुरूष अभिवादनापासून विन्मुख राहिल्याचे चित्र यावेळी अकोला जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात दिसल्याचे समजते. कामगारांच्या कामाचा अवधी १४ वरून ८ तासावर आणणारे कामगार नेते बाबासाहेबांनीच आठवडी सुटीसह अशा विविध सुट्यांचा आनंद आपल्या संविधानातील दुरदृष्टीतून याच अधिकारी कर्मचाऱ्यांना बहाल केला आहे.काम कितीही बाकी असलं तरीही आठवड्याची सुटी आणि विविध भत्ते तथा सवलती मात्र हे हक्काने घेत असतात. परंतू ज्यांच्यामुळे हे सगळं मिळालं त्यांची जयंती साजरी करण्यासाठी सुध्दा हे एक दिवस तासभरासाठी कार्यालयाला येण्याची तसदी घेत नाहीत.हा या महामानवाच्या आणि महापुरूषांच्या त्यागाच्या पुजेचा आणि कष्टाच्या ईतिहासाचा होणारा अपमान आहे.कर्तव्यधर्माशी केली जाणारी बेईमानी आणि स्वत:च्या अंतरात्म्याशी केला जाणारा अमानविय द्रोह आहे.  
        अकोल्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातही यावेळी संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरीच झाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.हे चित्र फक्त अकोलाच नाही तर सलग येणाऱ्या सुट्ट्याच्या या पट्ट्यांमध्ये हे अनेकठीकाणी घडत असते.अधिकारी मुख्यालयी येण्याचा कंटाळा करतात,आणि मग आपला चपराशी किंवा एखाद्या बाबूसाहेबांवर कसा बसा हार अडविण्याची जबाबदारी टाकून आपल्या सुट्ट्यांचा मनसोक्तपणे उपभोग घेत असतात. परंतू ज्या महापुरूषांच्या त्यागाने त्यांना मानाचे अधिकारी पद मिळाले त्यांच्याच योगदानाला दुर्लक्षित करून त्यांच्याप्रती कृतघ्नता दाखवण्याचा अप्रामाणिकपणा हेच अधिकारी- कर्मचारी करीत असतात. अकोल्याच्या सिव्हील लाईन पोलिस स्टेशनमध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर असलेला डॉ.बाबासाहेबांचा फोटोतील चेहरा बुरशी लागून काळवंडला होता.तरीही त्यांच्या लक्षात आणून देईपर्यंत अनेक महिन्यांपासून काळ्या झालेल्या या फोटोचे त्यांना भान नव्हते. महापुरूषांप्रती एवढा अनादर आणि निष्काळजीपणा हा चिंतनिय दुर्विलास आहे.वरीष्ठ आणि कनिष्ठ हे मधूर संबंधातील चचेरे भाई असल्याने कार्यवाहीला न घाबरण्याचा बेडरपणा कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे‌ या चिंतनिय बाबींकडे लक्ष कोणी द्यावे?
       अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा कार्यक्रम झालेला नसल्याची माहिती बाहेर आल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी अशा प्रतिक्रिया विविध करांच्या रूपाने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गलेलठ्ठ पगारांची सोय करणाऱ्या समाजातील संवेदनशील कार्यकर्त्यांकडून होत आहे. आपल्या कृतघ्न भावना प्रगट करून डॉ.आंबेडकर आणि महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात उदासिनता दाखविलेल्या शासकीय कार्यालयांच्या चौकशा व्हाव्यात. त्यासाठी त्यांचे सी सी टी व्ही फुटेजेस व कार्यक्रम रजिस्टरांची तपासणी व्हावी.रजिस्टर नंतरही बनावट लिहले जाऊ शकते.म्हणून सि.सी टी.व्हीं ची तपासणी विनाविलंब करावी.अशी आळशीपणाची गैरकृत्त्ये करणाऱ्या अधिकाऱ्या़ंवर कारवाया करून त्यांना निलंबित करावे.अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून करण्यात येत आहे.

    Post Views:  275


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व