राज्य सरकार उचलू शकते महत्त्वाचं पाऊल, अजित पवारांनी दिले संकेत


केंद्र सरकारनं ओमिक्रॉनबाबत जनतेमधील शंका दूर कराव्यात
 संजय देशमुख  09 Dec 2021, 4:27 PM
   

मुंबई: कोरोना व्हायरसचा  नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. देशातही ओेमिक्रॉनचे 23 रुग्ण (Omicron Patient) सापडले असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील ओमिक्रॉनचे आणखी 10 रुग्ण सापडल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी ही माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असून लहान मुलं देखील ओमिक्रॉनच्या विळख्यात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुढील काही दिवसांत महत्त्वाचं पाऊल उचलू शकतात, असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिले आहेत.

ओमिक्रॉनबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समध्ये (Task Force) चर्चा झाली आहे. ओमिक्रॉन बद्दल लोकांची मते वेगवेगळी आहेत. दिलासादायक बाब म्हणजे डोंबिवलीत आढळून आलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णापासून इतर कोणाला याची लागण झाली असेल, असं एकही प्रकरण आतापर्यंत समोर आलेले नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारनं ओमिक्रॉनबाबत जनतेमधील शंका दूर कराव्यात. देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. राज्यात कोरोना लसाचा पहिला डोस बहुतांश लोकांनी घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यात अनेक जिल्हे मागे आहेत. पहिला डोसनंतर 84 दिवसांनी दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या दीड कोटींहून अधिक आहे. पहिला डोस घेऊन 84 दिवस उलटल्यानंतर देखील बहुतांश नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. या लोकांना कोरोनाचा दुसरा डोस घेता यावा, यासाठी सरकार लवकरच पावले उचलू शकते, असंही अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री?
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात एकूण 10 ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सुमारे 65 स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. आता त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी 3 लॅब आहेत. येत्या काळात नागपूर आणि औरंगाबादमध्ये आणखी लॅब उघडण्यात येतील. महाराष्ट्रात जे 10 रुग्ण आढळले (Omicron positive) आहेत ते कोणत्या शहरातील आहेत याबद्दल काहीच माहिती समोर आली नाही.
दरम्यान, याआधी मुंबईत ओमिक्रॉनचे 2 रुग्ण होते. आज आढळलेल्या रुग्णांसह महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधित रुग्णसंख्या 20 वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राजस्थानमध्ये (Rajasthan) 9, कर्नाटकमध्ये (Karnataka) 2 तर गुजरातमध्ये (Gujarat) ओमिक्राॉनचा एक रुग्ण आढळला आहे. या सर्व राज्यांपाठोपाठ राजधानी दिल्लीत (Delhi) देखील ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे.

    Post Views:  402


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व