वाशिममध्ये गॅरेजला आग; २० लाखांचे नुकसान


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  15 Mar 2023, 6:49 PM
   

वाशिम : गॅरेजला आग लागल्याने तीन वाहने जळूक खाक झाल्याची घटना १४ मार्चच्या मध्यरात्रीदरम्यान कारंजा शहरातील बायपास परिसरातील झासी राणी चैाकात घडली. या आगीत १५ ते २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

झासी रानी चैाकातील एका कॅफेच्या मागच्या बाजुला असलेल्या कल्लु मोटार गॅरेजला अचानकपणे आग लागली. यामध्ये स्काॅर्पीओसह, मारोती कार, टाटा एसी आणि इतर साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी कांरजा न. प. च्या अग्निशमण दलाने घटनास्थळी धाव घेतली व काही वेळेच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत तीन वाहने जळून खाक झाली. पेालिसात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. गॅरेज जवळच्या रसवंती जवळील रस काढल्यानंतर उरलेल्या उसावर एखाद्या अज्ञात व्यक्तीने बिडी अथवा सिगारेट फेकल्याने हि आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

    Post Views:  121


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व