कापशी येथील नागरिकांची एस पी साहेबांना तक्रार पातूर पोलीस झाले निगर गट्ट !


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Dec 2022, 4:51 PM
   

पातुर : पातुर पोलीस स्टेशन  अंतर्गत येत असलेल्या कापशी सह इतर गावांमध्ये चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे.चोरट्यांनी  शेतकऱ्यांचे विहिरीवरील मोटर पंप केबल तसेच शेळ्या गुरेढोरे यांचे चोरीचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र पातूर पोलीस स्टेशन यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेत नाही तसेच तक्रार नोंदविली तरी एफ आय आर  ची कॉपी देत नाही त्यामुळे कापशी येथील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे  तक्रार दाखल केली आहे. 
कापशी येथील जिल्हा परिषद शाळा मधील दोन एल ई डी टिव्ही शेतकर्‍यांच्या  शेतातील मोटार पंप केबल व शेतीसंबंधी साहित्य तसेच शेळ्या ढोरे यासह शेतकऱ्यांच्या विहिरीमधील मोटर पंप केबल पाईप स्पिंकलर आधी साहित्य व गुरे ढोरे बकऱ्या बोकडे म्हैस, बैल जिल्हा परिषद शाळा मधील दोन एल ई डी टि व्हि आदी मोठ्या प्रमाणात चोर चोरी करीत आहेत याबाबत तक्रार देण्यासाठी गावकरी पातुर पोलीस स्टेशन कडे जात असताना वारंवार जात असताना तरीसुद्धा कोणत्याच प्रकारची तक्रार दाखल करण्यात येत नाही.
 व तक्रार जबरदस्तीने घेऊन घेतल्यास त्यावर एफ आर प्रत किंवा कसल्याच प्रकारची ओशी मिळत नाही व त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा चौकशी करण्यासाठी येत नसल्याने त्रस्त कापशी गावकर्‍यांच्या वतीने माजी सरपंच राजेश डोंगरे तंटामुक्ती अध्यक्ष गणेश यादव माजी तंटामुक्ती अध्यक्ष अजबराव तायडे समाधान इंगळे संजय रमेश केवट, अनिकेत थोरात बाळू डिवरे वैभव डिवरे, अंबादास जाधव ,दिनेश उमाळे, राष्ट्रपाल इंगळे, संदीप केवट ,अभिजीत संजय चतरकर, गणेश केवट, राजेश  केवट, संजय रघुनाथ केवट मंगेश  चऱ्हाटे आदी मंडळी हे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रर केली  आहे .तरी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना  कापशी येथिल नागरिकांनी त्यांची पातुर पोलिसां बाबत तक्रार नागरिक व शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.
 तसेच जाणून-बुजून चोरट्यांची दखल न घेतल्या संबंधी सुद्धा त्यांच्यावरही कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे .

    Post Views:  195


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व