अकोला : सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने गणेशोत्सवात आयोजित पर्यावरण व जनजागृतीपर घरगुती गणेश आकर्षक देखावा-सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक सजावटीत अनेक अभिनव कल्पकतेचे मार्ग शोधले आहेत. आकर्षक सजावट व देखावे साकारणारे गणेशभक्त स्पर्धेत सहभागी झाले.
सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा सलग दुसऱ्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘सामर्थ्य’ने विविध उपक्रम हाती घेतले. सामर्थ्यने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर तीन असे सहा पुरस्कार व चांदीची गणपतीची फ्रेम देऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. चिन्मय देव याने प्रथम तीन पुरस्कार, तर प्रोत्साहनपर पारितोषिक संजय देशमुख यांनी प्रायोजित केले. स्पर्धा नि:शुल्क असून सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट व जनजागृतीपर देखावा करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. सर्धेत सहभागासाठी समन्वयक रवींद्र बुलनकर (९८८१२००३५५), सुर्यकांत बुडकले (९९७५१७१२७७), प्रशांत चाळीसगांवकर (९५०३४१७००२) यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता वाढत असल्याचे स्पर्धकांनी साकारलेल्या सजावटीवरून लक्षात येते, अशी माहिती सामर्थ्यच्यावतीने देण्यात आली.
स्पर्धेत सहभागासाठी आज शेवटचा दिवस : सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने आयोजित घरगुती गणेशोत्सव पर्यावरणपूरक सजावट व देखावा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.