अकोला : बडे भाग पावा मनुज तन पावा सूर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा मानव जीवन भेटणे खुप भाग्याची बाब आहे त्या पेक्षा मोठे भाग्य सत्संग भेटणे मनुष्य श्रेष्ठ कर्मा द्वारे प्राप्त करू शकतो अध्यात्म एक विज्ञान आहे कोणतेही शॉर्टकट नाही जसे आपण पेराल तसेच उगवेल यज्ञ म्हणजे दान, देवपूजन व संगतीकरण जो पण श्रेष्ठ, पारमार्थिक, दुसऱ्या च्या भल्यासाठी, कार्य केले जाते ते सर्व यज्ञ आहे म्हणून ज्ञान यज्ञ, रक्तदान यज्ञ, भूकलेल्याला अन्न , तहानलेल्या ला पाणी, दीन दुःखी यांना अन्न, वस्त्र, औषधी इ साधन देणे म्हणजे सत्कर्म यज्ञ होत भारतीय संस्कृतीत प्रत्येक संस्कार योग्यग्नि च्या साक्षीने होते शेवटी शरीरातून प्राण निघून गेल्यावर शरीराला अग्नी मध्ये समर्पित केले जाते त्याला अंतिम संस्कार म्हंटले जाते ऋषि मुनि यांनी मानव जीवन यज्ञमय व्हावे या साठी गायत्री सद्बुद्धी व यज्ञ सत्कर्म चे प्रतीक सांगितले आहे लहानसे जीवन विकार आणि विकृती पासून वाचवून यज्ञमय व्हावे असे प्रतिपादन श्रीअग्रसेन भवन शेगाव येथे आयोजित गायत्री परिवार चे नवचेतना जागृती गायत्री महायज्ञ त अकोला गायत्री परिवार चे डा अजय उपाध्याय यांनी केले महायज्ञत विभिन्न संस्कार झाले व एक आदर्श विवाह संस्कार पण संपन्न झाले नवविवाहित जोडप्यानी तीन वृक्षारोपण करून संवर्धन करण्याचे संकल्प घेतले सर्व साधकांनी हाथ उचलून एक वाईट सवय सोडवायचे एक चांगले गुण धारण करावयाचे व भोलेशंकरजी व सूर्याला अर्ध्य रोज , चोवीस वेळी महामृत्युंजय मंत्र व गायत्री महामंत्र जप साधना , श्रेष्ठ कार्य हेतू समयदान, अंशदान , स्वाध्याय, संयम, सेवा करण्याचे संकल्प घेतले गायत्री महायज्ञ संचालन डा सुरेश राठी, डा अजय उपाध्याय, आशाताई शिंदे,पंडित अभयजी उपाध्ये महाराज, रचना काबरा,प्रताप पटेरिया यांनी केले संगीत साथ दीपक लुले, राजगुरू पवार यांनी दिली नवचेतना जागृती अभियान सफल बनविण्यासाठी सीमा खेतान, प्रल्हाद रोंदले, प्रकाश पोटे, चंदा खेतान, पदमा सलामपुरीया, मनीष टिबडेवाल डा हरीश सराफ, डा कविता सराफ ,शिला पटेरिया, जगदीश खेतान, दिलीप सारंगधर, गायत्री परिवार महिला मंडळ शेगाव, गायत्री परिवार अकोला यांनी परिश्रम घेतले
Post Views: 171