विधानसभा आचारसंहितेपूर्वी राज्यातील गुणवंत कामगारांना, इतर विभागाप्रमाणे लाभ देणार - कामगार मंत्री मा. ना. डॉ. सुरेश खाडे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Jul 2024, 12:39 PM
   

मिरज : इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे शुक्रवार दि. २६ जुलै रोजी, गेल्या दोन वर्षांमध्ये कामगार मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व गुणवंत कामगारांना, राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारार्थी प्रमाणे लाभ देणार असण्याची ग्वाही कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली. 
         राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने गेल्या दोन वर्षांमध्ये मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, कामगार विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कामगार मंत्री मा. ना. डॉक्टर सुरेश खाडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांचा अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. 
         यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरेश खाडे यांनी, मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर पासून घेतलेल्या अनेक कामगाराभिमुख व समाजाभिमुख चौफेर कार्याचा उल्लेख करून, कामगारांच्या मुलांना उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर यापुढील काळातही समाजसेवेचा वसा अधिक जोमाने सुरू राहील असे सांगितले. तसेच विधानसभा आचारसंहितेपूर्वी कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले.
         कामगार कल्याण मंडळाचे, कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कामगार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन, यापुढील काळातही संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबवून, कामगार वर्गाचे सर्वार्थाने हित जोपासले जाईल असे प्रतिपादन केले. 
         राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पदभार स्विकारल्यापासून, राज्यांमध्ये सर्व क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे चांगले निर्णय घेतलेले आहेत. शासनाने लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजनांची अंमलबजावणी करून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल समाधान व्यक्त करून, लाडका गुणवंत कामगार ही योजना सुद्धा राज्यांमध्ये लागू करावी अशी आग्रही मागणी केली. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी, एक कामगार राज्याचा कामगार मंत्री झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने लाभार्थींना विविध धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे तसेच इतर लाभाच्या योजनांचे धनादेश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे व कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
         कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये भारतीय कर्मचारी महासंघाचे दिलीपदादा जगताप, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, प्रभाकर कांबळे, संजय सुर्वे, अनिता काळे, संजय सासणे, महादेव चक्के, प्रताप घेवडे, दिलीप घोलप, दत्तात्रय शिरोडकर, साधना भगत, गोविंदराव पाचपोर, नारायण धनगर, विजय आरेकर, शिवाजी चौगुले, प्रशांत उपाध्ये, भास्कर शिंदे, दिनकर आडसूळ आदी. ३६ जिल्हयातील गुणवंत कामगार, स्थानिक नगरसेवक, विविध संघटनांचे कामगार प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जवळपास २००० पेक्षा जास्त कामगार कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सौ. परब यांनी केले तर आभार सहा. कामगार आयुक्त मुजावर यांनी मांनले. 
         सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, सर्व केंद्र संचालक व दोन्ही विभागाचा सर्व स्टाफ यांनी अविरतपणे प्रयत्न केले.

    Post Views:  24


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व