स्वाती इंडस्ट्रिज लाडकी कोणाची?; लाडक्या अकोलेकरांसाठी निलेश देव यांचे अन्नत्याग!


अन्नत्यागाचा पहिला दिवस
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jul 2024, 3:29 PM
   

अकोला : निविदा प्रक्रियेत अनियमितता, राज्यात कुठेच कर वसुलीचे खाजगीकरण नाही, स्वाती इंडस्ट्रिजजवळ मालमत्ता पुनर्मुल्यांकनाचा अनुभव नाही, महापालिकेत लोकनियुक्त सरकार नाही. अशा परिस्थितीत प्रशासक राज व्यवस्थेत अकोलेकरांवर अन्याय करण्यासाठी स्वाती इंडस्ट्रिजला फायदा पोहचविण्याच्या उद्देशाने कर वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले. यातून अकोलेकरांची होणारी लुट थांबवावी. त्याच बरोबर पाच वर्षाचा सुमारे पंधराशे कोटींचा करार प्रशासक यांनी कोणत्या अधिकारात केला. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी आजपासून राऊतवाडी चौकात अन्नत्याग केला आहे. 
या आंदोलनाने महापालिकेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे आंदोलन करताना इतर ही विविध मागण्या निलेश देव यांच्या आहे. स्वाती इंडस्ट्रिजला ठेका देण्यामागचे कारण काय आणि ती कोणाची लाडकी आहे. या लाडक्या कंपनीला फायदा पोहचविण्यामागे कोण आणि यासाठी अकोलेकरांवर अन्याय का ? असा प्रश्न निलेश देव यांनी आज उपस्थित केला. आंदोलन स्थळी सर्व पक्षीय नेत्यांनी भेट देत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तर शुगर असलेल्या निलेश देव यांना अनेकांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला  दिला.  
अकोला महापालिकेच्या कर वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले. राज्यात कुठे ही अशा प्रकारे कर वसुलीचे खाजगीकरण नसताना ते रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी केली आहे. त्यांनी अन्नत्याग आंदोलन करत महापालिकेच्या करवसुली खाजगीकरणास विरोध केला आहे. स्वाती इंडस्ट्रिज विरोधात मुंबईत काही दिवस आंदोलन, अकोल्यात जनजागृती आणि आता पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलन करत निलेश देव यांनी राऊतवाडी चौकात आंदोलन सुरु केले आहे. 
सामान्य लोकांनी महापालिकेत १०० रुपये भरल्यावर त्यापैकी ८.३९ पैसे स्वाती इंडस्ट्रिजला दिले जातात.अकोल्यात कोणाच्या आशिर्वादाने खाजगीकरणातून कर वसुली सुरु केल्या गेली, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी विचारला आहे. स्वाती इंडस्ट्रिजची खाजगी वसुली बंद करा, महापालिका कर्मचार्‍यांना काम करु द्या, त्याच बरोबर विविध मागण्यासाठी हे आंदोलन त्यांनी सुरु केले आहे. त्यात गुंठेवारी पुन्हा सुरु करा, आर्थिक वर्षात आगावु कर भरलेल्या नागरिकांना अभय योजनेच्या अटी प्रमाणे जास्तीचे कर परत द्या या सह विविध मागण्या त्यांच्या आहेत. आज पासून सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी राऊतवाडी चौकात हे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. लाडक्या अकोलेकरांच्या हक्कासाठी हे आंदोलन असून खाजगी कर वसुली करणारी स्वाती इंडस्ट्रिज कोणाची लाडकी असा प्रश्न विचारत त्यांनी अन्नत्याग केले आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या
१.मालमत्ता कर वसुली खाजगी वसुलीस स्थगिती द्यावी.
२.मालमत्ता मुल्यांकनाचे मुळ काम स्वातीकडेच नाहीच
३. मालमत्ता असेसमेंटचा अनुभव स्वाती इंडस्ट्रिजला नाही
४. स्वाती चे टेंडर रद्द करत प्रशासकांची चौकशी करा. 
५. शास्ती अभय योजनेपुर्वी पैसे भरलेल्या नागरिकांना दिलासा द्या.
६. मालमत्ता कर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईस्तोवर निर्णय नको.
७. शास्ती अभय योजनेपुर्वी करवसुलीत समाविष्ठ दंड ,व्याज परत द्या.
८. कोविड काळातील पाणी पट्टी सरसगट माफ करा.
९. मनपाच्या प्रशासकीय इमारतीस स्वातंत्र्य सैनिक दुर्गाताई जोशी नाव द्या.
१०. प्रभाग तीन मधील कोट्यावधीची बंद पाईप लाईन सुरु करा.
११. गुंठेवारी नुसार सामान्य खरेदी व्यवहार चालु करा.
१२. अमृत दोन योजना अकोला (पुर्व) भागात राबविण्याची मागणी.
१३. अमृत दोन मध्ये न्यू तापडीया नगर, खरप, उमरी भागात जलवाहिनी व ड्रेनेज करा.
१४. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना काम करु द्या. खाजगीकरण थांबवा.

    Post Views:  160


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व