दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे हर घर तिरंगा अभियान जनजागृती


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Aug 2022, 10:03 PM
   

अकोला :स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात हर घर तिरंगा अभियान जनजागृती सुरू आहे .दि.13 ऑगस्ट २०२२ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या कार्यालयावर  राष्ट्रध्वज फडकवण्यात आला .राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला सलामी देण्यात आली .विशेष म्हणजे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने सर्वत्र हर घर तिरंगा या मोहिमेची जनजागृती केली जात आहे .राष्ट्रध्वज कसा फडकवावा ? त्या संदर्भात नियम कोणते ? याविषयी सर्वत्र माहिती प्रा.विशाल कोरडे आपल्या व्याख्यानातून देत आहेत .विशेषतः दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक माध्यमावरून याविषयी जनजागृती करण्यात येत आहे .दिव्यांग बांधवांना संपूर्ण माहिती दिली जात आहे .प्रा.विशाल कोरडे यांच्या या कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे . या जनजागृती अभियानात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे अरविंद देव ,अनामिका देशपांडे ,स्मिता अग्रवाल ,तृप्ती भाटिया ,श्रीकांत कोरडे हे सदस्य कार्य करीत आहेत .

    Post Views:  172


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व