स्वतःला बदला जगाला सुधरवा : गायत्री परिवार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Mar 2023, 8:45 AM
   

अकोला : दूषवृत्ती चे  उन्मुलन साधना आहे व  सतप्रवृत्तीचे  संस्थापन उपासना , राक्षसी प्रवृत्ती चे उन्मुलन व  देवत्व वृत्तीचे परिपोषण हेच  धर्म धारणा होत आणि हीच ईश्वर आराधना आहे विचार क्रांती या युगाची सर्वात मोठी आवश्यकता आहे समग्र विचार क्रांती चे शुभारंभ स्वतः पासून होते खरे  उपदेशकाचे प्रभाव चरित्रनुसार पडते बोले तैसा चाले वंदावी त्याची पाऊले  युग निर्माण च्या तीन पायऱ्या आहेत आत्मनिर्माण, परिवार निर्माण, व समाज निर्माण  अति आवश्यक आत्मनिर्माण स्वतः चे निर्माण आहे तप तितीक्षा , साधना उपासना , स्वाध्याय सत्संग चे एक मात्र उद्देश  आत्मबल  उत्पन्न करण्याची पृष्ठभूमी मनस्थिती बनविणे आहे  ईश्वराला  कोणाची स्तुती खुशामद नाही पाहिजे   पूजा पत्री पान फुल कर्मकांड द्वारे तो  प्रभावित होत नाही  न विविध विधि कर्मकांड द्वारे त्याची प्रसन्नता अप्रसन्नता सोबत काही संबंध आहे संपुर्ण  धर्म आवरण व  उपासना प्रकरण  विशुद्ध रूपाने स्वतःची आंतरिक शुद्धी, परिशोधन, व्यक्तिव परिष्कर  साठी आहे असे प्रतिपादन गायत्री परिवार अकोला चे जेष्ठ समर्पित कार्यकर्ता श्री गोविंदराव रायलकर यांनी  श्री दुर्गा माता मंदिर जुने खेतान नगर कौलखेड अकोला येथे आयोजित पंचकुंडीय गायत्री महायज्ञ केले  डा अजय उपाध्याय यांनी गायत्री परिवार च्या सक्रीय भगिनी समर्पित होऊन विचार क्रांती अभियान, युग निर्माण, गर्भसंस्कार आंदोलन घरो घरी निस्वार्थ भावनेने पोहचवीत आहे या  युगा च्या समस्याचे समाधान साठी मातृ सत्ता ला जागविणे शिक्षित व संस्कारित करणे, त्यांचे  अधिकार, सन्मान देणे अत्यंत जरुरी आहे असे सांगितले  सर्व गायत्री परिवार सक्रिय भगिनींचे  अभिनंदन, सन्मान करण्यात आला व  पुष्पवृष्टी करून हार्दिक शुभेच्छा दिल्या  गायत्री महायज्ञ त पुंसवन गर्भसंस्कार, जन्मदिवसोत्सव संस्कार संपन्न झाले  से. नि. प्राचार्य श्री किसनराव मोरे पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला  मोरे परिवार द्वारे सर्व साधकांना बसवून प्रेमपूर्वक आपल्या संस्कृती अनुरूप भोजन प्रसाद वाढण्यात आले  नवचेतना जागरण अभियानाला सफल बनविण्यासाठी  हरी भक्त परायण बबन दाणे महाराज, देवचंद कावळे, डा अजय उपाध्याय,गोविंद रायलकर, किसनराव मोरे,विनोद मापारी, योगिता सातपुते, राधाताई मोरे,वंदना फाटे, पल्लवी चवरे, प्राची टाकसाळकर,अनिता दही, रेखाताई शिंदे, सुनंदा देशमुख,शीतल सावके, तृप्ती ढवळे, प्रीती देशमुख, गायत्री परिवार महिला मंडळ अकोला व दुर्गा माता मंदिर भक्त व विश्वस्त मंडळ यांनी परिश्रम घेतले

    Post Views:  96


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व