आचार्य बालकृष्ण महाराज यांचा जन्म दिवस जड़ी बूटी दिवस म्हणून साजरा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Aug 2024, 9:53 AM
धन्वंतरी आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकृष्ण महाराज यांचा जन्मदिन जडीबुटी दिन म्हणून ४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पूज्य शिवधारा आश्रम सिंधी कैंप अकोला येथे सकाळी 6.30 से 7.30 वाजता पतंजलि योग परिवार तर्फे जडीबुटी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ सूहास काटे, डॉ राजेशजी भोंडे, हरीशभाई माखीजा, हरीश भाई पारवानी, श्रीकांत चाळीसगावकर, प्रदिप बांधवकर, चंद्रशेखर फुलझेले,के एल अप्तुरकर, व इतरही योग साधक ऊपस्थित होते.
यानंतर रामदास पेठ टिळक पार्क येथे पतंजलि जिल्हा सहप्रमुख हरीशभाई माखीजा यांचे हस्ते विविध जडीबुटी चे वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर डॉ राजेशजी भोंडे यांनी प्रत्येक औषधी युक्त झाडांची माहिती, त्याचा उपयोग,वापर,फायदे याबाबत सविस्तर सूंदर असे मार्गदर्शन केले. व योगाभ्यासही घेतला. सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत शब्दसुमनांनी करण्यात आले. रामदास पेठ टिळक पार्क येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुनिता कावळे मॅडम यांनी केले.
त्यानंतर आमच्या जेष्ठ साधक मीनाताई गणगणे यांनी औदुंबर पारीजातक जांभूळ व ईतर विवीध प्रकारचे वृक्ष आणले, मान्यवर व ईतर साधक यांचे हस्ते टिळक पार्क मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात योग शिक्षक, योग साधक व असंख्य योगप्रेमी ऊपस्थित होते. त्यामधे डॉ सुनिता कावळे, सुरेश जी दरेकर.श्रीकांत चाळीसगावकर, किरण चौक, प्रदिप बांधवकर, अशोक राऊत,के एल अप्तुरकर,प्रकाश कुलकर्णी, प्रफुल्ल गुप्ते,निलेश जाजु, चंद्रशेखर फुलझेले, डॉ ऋषीता मुनोत, रूपल दोशी ,सौ.सिमा फुलझेले , प्रतिभाताई भोजने, साधनाताई चौरसिया, अनुराधा राऊत, वंदनाताई चिंचोळकर, वर्षा ठाकरे, भाविका बाविशी, सुचित्रा पोतदार, वैशाली पागृत,कोमल भगरे ,,पारुल चौरसिया, क्षितीजा काटे,वडी छाया अग्रवाल, विशाखा राजे,सोनल शहा, नंदाताई बुंदेले, कल्पना ताई गायकवाड, अँड . निर्मलाताई नागदेवे , शिरवळकर ताई, खुमकर ताई, सायली गुप्ते,रेणुका ताई मेश्राम, मंजीरीताई कुळकर्णी, थोटे ताई,कु.चौरसिया कु ठाकरे व कु.मेश्राम,ईतरही महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ सुनिता कावळे, श्रीकांत चाळीसगावकर, रुपल दोशी, डॉ ऋषिता मुनोत, प्रदीप बांधवकर, श्री अशोक राऊत , किरण चौक, यांनी परिश्रम घेतले. शेवटी शांतीपाठ म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 71