पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केला डॉ.विशाल कोरडे यांचा सत्कार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
22 Apr 2024, 8:22 AM
अकोला : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम ॲन्ड सोशल वर्क व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोलाचे ब्रँड अँबेसिडर विशाल कोरडे यांना मतदान जनजागृती कार्यक्रमात प्रमुख व्याख्याता म्हणून दि.२१ एप्रिल २०२४ रोजी आमंत्रित केले होते . अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग , प्राचार्य डॉ.गणेश बोरकर व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदाच्या उपस्थितीत डॉ.कोरडे यांनी विद्यार्थी वर्गास मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली. डॉ.कोरडे यांनी मतदार साक्षरता अभियान संगीतमय पद्धतीने राबवले. स्वतः लिहून स्वरबद्ध केलेले गीत चला उठा जागृत होऊन करूया मतदान हे मतदार साक्षरता गीत गाऊन सर्व उपस्थितांची दाद मिळवली . या मतदार साक्षरता गीताला तबल्याची साथ दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे दिव्यांग सदस्य रोहित सूर्यवंशी यांनी केली.उपस्थित विद्यार्थ्यांच्या सोबत अग्रणी दूत डॉ.कोरडे यांनी संवाद साधून मतदानाचे महत्त्व विशद केले . दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपीचा उपयोग कसा केला जातो ? याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दिले . ब्रँड अँबेसिडर डॉ.विशाल कोरडे यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंग यांनी त्यांचा सत्कार केला . श्री बच्चन सिंग यांनीही मतदान जनजागृती कार्यक्रमात आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . मी मतदान करणार आम्ही मतदान करणार या घोषाने सर्व महाविद्यालय परिसर दुमदुमला होता.मतदार साक्षरता अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अनामिका देशपांडे,अस्मिता मिश्रा,सिद्धार्थ ओवे,गणेश सोळंके,संजय फोकमारे,विजय कोरडे,श्वेता धावडे, कोमल चिमणकर व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .
Post Views: 72