अकोला : गणित विषय क्लिष्ट समजला जात असला तरी मुळात गणित आनंददायी आहे. विद्यार्थ्यांची गणिताप्रति रुची वाढावी व तसेच त्यांच्यातील कल्पकतेला व्यासपीठ मिळावे या हेतुने प्रभात किड्स स्कूल द्वारे पाच दिवसीय गणित महोत्सव मॅथेमॅटीक्स टू मॅथेमॅजिक आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाची सांगता राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून दि. २२ डिसेंबर रोजी करण्यात आली.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे व संचालिका सौ. वंदना नारे यांच्या हस्ते जागतिक ख्यातीचे गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ, समन्वयक प्राथमिक मंजु जोशी गणित विभाग प्रमुख प्रिया शर्मा, सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर संचालन स्निग्धा देशमुख हीने केले तर यावेळी गणित शिक्षिका वर्षा काळे यांनी गणितावर सुंदर कविता सादर केली. दि. १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध कलात्मक उपक्रम राबविण्यात आले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध भूमितीय प्रतिकृती बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांनी भुमितीय शहर प्रतिकृती स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जलद प्रश्न गणित स्पर्धेसह मॅथस रंगोली स्पर्धादेखील डिसेंबर रोजी घेण्यात आली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणिताप्रति त्यांच्या भावना कलात्मक रितीने वारली लोकचित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त केल्या. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कौन बनेगा मॅथेमॅटेशियन ही अभिनव अशी गणित मंजुषा घेण्यात आली. यामध्ये १२ विद्यार्थी अंतिम फेरीमध्ये पोहचले तर पद्माकांत बोथा आणि सिया अग्रवाल या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत बाजी मारली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित विभाग प्रमुख प्रिया शर्मा, तृप्ती राऊत, अर्चना राठी, वर्षा काळे, मिथिलेश दुबे, योगेश साहु, लक्ष्मी बोथा, सोनाली पांडे, पुनम तडस, संजिवनी मार्वंâड यांच्यासह क्रिडा विभागाच्या शिक्षकांनी अथक परीश्रम घेतले.
शिक्षणाधिकारी यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑक्टोबरमध्ये प्रभात किड्स स्कूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर यांनी गणिताप्रति विद्यार्थ्यांच्या मनातील भिती कमी व्हावी या हेतुने विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. प्रभात किड्स स्कूलने या आवाहनास प्रतिसाद देत आनंददायी गणिताचे विविध उपक्रम राबविले आहे.
Post Views: 295
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay