बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव श्री.नितेशजी कराळे यांच्या प्रबोधनाने साजरा
हिंगणघाट (किशोर मुटे )
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त महापुरुषांचा सामूहीक जयंती महोत्सव भव्य स्वरूपात युवा जागरण मंच इंझाळा तेथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. ॲड. सुधीरजी कोठारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिंगणघाट हे होते. तसेच कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून मा.संपतजी चव्हाण साहेब, ठाणेदार हिंगणघाट,मा. नितेशजी कराळे सर, फिनिक्स अकॅडमी वर्धा, मा.अतुलजी वांदिले, संस्थापक अध्यक्ष आधार फाउंडेशन, मा. शिवराजदादा शिंदे, युवा उद्योजक वर्धा, मा. किशोरजी मुटे, माहिती अधिकार विदर्भ अध्यक्ष, मा. वैभवजी बोंदाडे,मराठा बटालियन इन्फंट्री फौजी इंझाळा, मा. वंदनाताई वारकर,आशा सेविका इंझाळा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची उपस्थिती मा. सोमनाथजी टाफरे साहेब, पी.आय.हिंगणघाट,मा. भूषणजी भोयर हिं.पो. स्टे., गुणवंता कामडी वेळा, मा. सौ. कलावतीताई सायंकार, सरपंच, मा.कमलाकरजी खुरसंगे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मा. नारायणराव तीमासे, मा.प्रदीपजी मुडे, मा.सौ.वनिताताई काळेवार, मा.सौ.सुमित्राताई बोंदाडे व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मंडळ युवा वर्ग उपस्थित होते. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मा.सुरेंद्रजी डोंगरे यांचा प्रबोधनपर गीतांचा बहारदार कार्यक्रम बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अश्विन बोंदाडे, पंकज झांमरे, देवानंद थुल,शुभम हातेकर,विक्की करपाते,अमर झांमरे,प्रफुल पिसे,प्रवीण गुरनुले,गणेश वारकर,साहिल वाघमारे, सुदर्शन पाटील, कमलाकर झांमरे, गणेश गाठे, हनुमान वसाके, गणेश तरपाते, सुमित मुडे, नितेश मुडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुडे यांनी केले.
Post Views: 249