नंदी पाणी पितो किंवा दूध पितो यावर विश्वास ठेवू नये, ही एक मोठी अंधश्रद्धा


 संजय देशमुख  2022-03-06
   

अकोला: अकोला जिल्हात अनेक गावांमध्ये अनेक मंदिरांमध्ये स्त्री, पुरुष नंदी च्या मूर्तीला पाणी पाण्याचे ,दूध पाजण्याचे काम करीत आहेत. ही एक अंधश्रद्धा असून यावर कोणत्याही नागरिकांनी विश्वास ठेवू नये .कारण नंदी दूध किंवा पाणी पीत आहे ही बाब शंभर टक्के खोटी आहे .कोणतीही मूर्ती अशाप्रकारे कधीच दूध वा पाणी पीत नाही. हे यापूर्वीसुद्धा 21 सप्टेंबर 1995 ला देशभरातील गणपती दूध पीत असल्याचे खोटेपणा दिवसभर चालला होता. त्यावेळी हा प्रकार म्हणजे केश्याआकर्षणाचा नियमातून घडत असल्याची बाब अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  या आधीच स्पष्ट केली आहे .त्याचा भांडाफोड ,फोलपणा उघड केलेला आहे. परत 27 वर्षांनी ही खोटी बाब रिचार्ज केल्या जात आहे. देव आणि धर्माच्या नावावर लोकांच्या भावनांना हात घालून अंधश्रद्धा पसरण्याचे काही लोक काम करीत आहे .अशा लोकांपासून नागरिकांनी, महिलांनी दूर राहून यामागील वैज्ञानिक कारण समजून घेतले पाहिजे .त्यामध्ये गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स Gravitational Force या प्रक्रिया , नियमाचा उपयोग हे चमच्याने पानी पाजताना होत असतो .यात कोणताही चमत्कार नाही .ही बाबा विज्ञानाने सिद्ध केली आहे . तरीही काही लोक  अजूनही नंदीला पाणी पाजण्याच्या या अंधश्रद्धेला बळी पडून जिल्ह्यामध्ये अफवा पसरण्याचे काम करीत आहेत. अशा लोकांपासून नागरिकांनी, महिलांनी दूर राहावे . तसेच आपल्या व्हाट्सअप ,फेसबुकवर, सोशल मीडियावर सुद्धा अशा प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा त्याचे व्हिडिओ पसरू नये ,फॉरवर्ड करू नका असे कळकळीचे नम्र आवाहन गजानन हरणे ,ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ????माननीय संपादक साहेब,

    Post Views:  304


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व