अवतरण चिन्ह काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


 विश्वप्रभात  28 Feb 2026, 7:48 PM
   

साहित्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे युवा साहित्यिक साहित्यिक  श्री. प्रवीण जगन्नाथ बोपुलकर यांच्या अवतरण चिन्ह या काव्यसंग्रहास सर्वमंगल विवाह संस्था यांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी राज्यभरातून एकूण २०६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. प्रसिद्ध पाठ्यपुस्तकातील कवी हणमंत चांदगुडे यांनी परीक्षण करून अवतरण चिन्ह या काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
मूळ अकोला जिल्ह्यातील खेट्री (ता. पातूर) येथील रहिवासी असलेले प्रवीण बोपुलकर सध्या पनवेल येथे वास्तव्यास असून ते वस्तू व सेवा कर विभाग, मुंबई येथे राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेसोबत साहित्य क्षेत्रातही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांचे अवतरण चिन्ह हा काव्यसंग्रह, वाळन कथासंग्रह  प्रकाशित आहे. 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह विविध राष्ट्रीय साहित्य मंचांवर निमंत्रित कवी व गझलकार म्हणून सन्मान मिळवलेले बोपुलकर यांना यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अवतरण चिन्ह काव्यसंग्रहाला मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या साहित्यिक प्रवासातील आणखी एक मानाचा टप्पा मानला जात असून साहित्यप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Post Views:  6


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व