पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
बुधवारी (दि.8) होणार 243 पदांसाठी भरती प्रक्रिया
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Feb 2023, 8:34 AM
अकोला - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 8 फेब्रुवारी रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात 243 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी इच्छुक पात्रताधारकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.8 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मेळावा होणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 व भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 277