वडगाव वान येथील स्वस्त धान्य दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयास मारहाण करून ई पास मशीन फोडणाऱ्या वर कारवाई करा!
संग्रामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन..
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
02 Nov 2022, 9:16 AM
स्वप्निल देशमुख (संग्रामपूर) : संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी स्वस्त धान्य दुकानदार श्रीकृष्ण पिंजरकर यांचा नातू स्वस्त धान्य दुकानात वाटप करत असताना नातू ऋषिकेश पिंजरकर व त्यांची आई गयाबाई प्रकाश पिंजरकर यांना वडगाव वान येथीलच रेशनकार्ड धारक मोहन ओंकार कुरवाडे या इसमाने मागील महिन्याचे गहू व चालू महिन्याचा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा गहू आणि आनंदाचा शिधा किट न मिळाल्याने गयाबाई पिंजरकर यांना लोटपाठ करून दोघांनाही शिवीगाळ केली.
तसेच जबरदस्त मारहाण सुद्धा केली तसेच शासनाने दिलेल्या मशीनची तोडफोड सुद्धा केली अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरुद्ध संग्रामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून.
शासनाने दिलेल्या ई-पाॅस मशीन फोडणाऱ्यावर आपण आपल्या स्तरावर तहसील मार्फत तक्रार पोलीस स्टेशन तामगावला देण्यात यावी व संघटनेला सहकार्य करावे व आरोपीवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी.
जोपर्यंत आरोपीवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत संग्रामपूर तालुक्यातील एकही स्वस्त धान्य दुकानदार दुकानात वाटप करणार नाही. याची नोंद घ्यावी असे निवेदन संग्रामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना दिनांक 1 नोव्हेंबर रोजी देण्यात आले असुन निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, तहसीलदार संग्रामपूर, जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष तसेच पोलीस स्टेशन तामगाव यांना देण्यात आले असून. यावेळी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आणि संग्रामपूर तालुका अध्यक्ष केशवराव दाने पाटील व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
Post Views: 242