मातृशक्तीची समुहशक्ती, रामरक्षेची लक्षपुर्ती


बिर्ला राम मंदिरात भव्य दिव्य सोहळा ; अकोल्याच्या इतिहासात नवा विक्रम स्थापित
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Jan 2024, 8:39 AM
   

अकोला - आज एकीकडे अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळा आणि त्याच वेळी बिर्ला राम मंदिर येथे चार हजार मातृशक्ती व एक हजार विद्यार्थ्यींनीच्या उपस्थितीत रामरक्षा लयबध्द चालित म्हटले गेले. अयोध्येत राममंदिर उत्सव सुरु असताना अकोल्यातील मातृशक्तीने सामुहिकपणे रामरक्षा म्हणत अकोल्यात नवा विक्रम स्थापित केला. इतकेच नाही तर एक लाख वेळा रामरक्षा पठनातून बिर्ला राम मंदिरामध्ये नवचैतन्य आणि उत्साह भाविकांमध्ये निर्माण झाला होता. गेल्या एक महिन्यापासून निलेश देव मित्र मंडळाच्या सामुहिक प्रयत्नातून हा सोहळा यशस्वी संपन्न झाला. या रामरक्षा सोहळ्यात समाविष्ठ झालेल्या प्रत्येकाला राम प्रसादासह मिष्ठान्न देण्यात आले. ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळाने याचे यशस्वी आयोजन केले होते. 

अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे थेट प्रसारण आज बिर्ला राममंदिर येथे दाखविण्यात आले. सकाळी दहा वाजता राम मंदिरात शंखघोषात राष्ट्रसेविका समितीमार्फत आरती करण्यात आली. आजच्या सोहळ्यासाठी बिर्ला राममंदिर सजविण्यात आले होते. त्याच बरोबर राम मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. सकाळी दहा वाजता सामुहिकपणे चार हजार मातृशक्तीने सामुहिकपणे रामरक्षा पठन केली. लहान वयात एक हजार विद्यार्थ्यींनीवर हिंदू संस्कृती आणि आचार विचारांचे शिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने त्यांना ही रामरक्षा पठनाच्या सामुहिक सोहळ्यात सहभागी करण्यात आले होते. या सोहळ्यात शाळा व शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यींनींना आणण्याची जबाबदारी घेत सहभाग नोंदविला. केळीचे खांब लावून सजविण्यात आलेल्या मंगलमय परिसरात प्रभु श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. गोंधळेकर महाराज सेवा समितीच्या भगिंनींनी समुह स्वरात रामरक्षा पठन केले. अयोध्येत प्रभु श्रीरामांची स्थापना झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोषाने संपुर्ण परिसर दणाणून गेला होता. सकाळी दहा ते दूपारी दीड या वेळेत हे रामरक्षा पठन झाले. केवळ जठारपेठच नाही तर अकोला शहरातील विविध भागातून मातृशक्तीने या सोहळ्यात सहभाग नोंदविलाचा आनंद प्रमुख आयोजक निलेश देव यांनी व्यक्त केला. रामकार्यात मातृशक्तीचा हातभार हे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी बोलताना नरेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केला. मातृशक्तीच्या सामुहिक प्रयत्नांनी संपुर्ण परिसरात नवचैतन्याची अनुभूती झाल्याचे दैनिक देशोन्नतीचे संचालक ऋषीकेश पोहरे म्हणाले. शिस्त आणि नियोजित कार्यक्रमाबद्दल पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी कौतुक केले. रामदास पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज बुहेर यांनी घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोेबस्त दिला. महापालिकेच्या पुर्व झोन चे श्रेत्रीय अधिकारी विजय पारतवार यांनी विशेष मदत या कार्यक्रमासाठी झाली. त्याचा बरोबर रामाएम्पायर परिवाराने या सर्व कार्यात भरिव मदत केली.      
या भव्य दिव्य कार्यक्रमाला जालना येथील श्री कारवा, गोपाल खंडेलवाल, नरेंद्र देशपांडे, संजय रुहाटिया, शैलेश खरोटे, ऋषिकेश पोहरे, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील, माजी आमदार वसंतराव खोटरे, जयंतराव सरदेशपांडे, डॉ.विनायक देशमुख, बाबासाहेब पाठक, नरेश बियाणी, डॉ.श्रीपाद रत्नाळीकर, डॉ.आनंद पाडव, मुरलीमामा शर्मा, डॉ.आर.बी.हेडा, प्रल्हाद महाराज उपासक मंडळ चे सेवाधारी, उदय जी महा आणि ब्राह्मण महासंघ संपुर्ण टिम, राष्ट्र सेविका समिती, विश्व मांगल्य सभा समुह, गुरुद्वारा सेवा समिती, रामा एम्पायर परीवार, गोंधळेकर महाराज सेवा समिती, श्रीनाथ दत्त मंदिर सेवा समिती चे सदस्य उपस्थित होते. यावेळी रामरक्षेविषयी विस्तृत माहिती दिलीप देशपांडे यांनी दिली. तर मंजुषा घोटीकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमास प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार रश्मी देव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश जोशी, रामहरी डांगे, राजु कनोजीया, राजु गुन्नलवार, गणेश मैराळ, अजय शास्त्री,दिपक शुक्ला, मुकुंदराव देशपांडे,सोनु मोटे,अक्षय मिश्रा, शशी हिवरखेडकर, श्रीराम उमरेकर, विजय वाघ, रवी मेश्राम, नरेश परदेसी, भास्करराव बैतवार, अंकुश तिरपुडे, मनिष अभ्यंकर, निलेश पवार, बबलु तिवारी, प्रसाद देशपांडे,केने, यादव, मारवाल, सातपुते, देवपुजारी आदींची मोलाची मदत झाली. 

    Post Views:  93


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व